कोकणमहाराष्ट्रराजकीय

शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

*🟥 शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी*

*🟥 खासदार विनायक राऊत म्हणतात आढळराव पाटील आजही शिवसेनेतच*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴 मुंबई, दि.:४जुलै*
शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत. ते शिवसेना उपनेता म्हणून कार्यरत असल्याचा खुलासा शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा’ अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामना या मुखपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. आढळराव पाटील यांची फेसबुक पोस्ट ही पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सकाळीच वृत्त समजताच आढळरवांना देखील धक्का बसला होता. मात्र, ते शिवसेनेतच असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
काल रात्रीच उद्धव ठाकरेंशी आढळराव पाटील यांचे फोनवरुन बोलणं झालं होतं. त्यावरुन सकाळी पक्षातून हकालपट्टी होईल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती, अशी पहिली प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती. शनिवारी रात्री फोनवरुन झालेल्या संभाषणात, जिल्ह्यातील काही पदाधिकारी आपणास रविवारी भेटायला येणार आहेत, याची कल्पना मी उद्धव ठाकरेंना दिली. त्यावेळी मला फेसबुकवरील शुभेच्छांबद्दल उद्धव ठाकरेंनी विचारलं. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना मी फक्त शुभेच्छा दिल्याचं स्पष्टीकरणही त्यांना दिलं. शिवाय मंगळवार अथवा बुधवारी मुंबईत भेटायचंही आमचं ठरलं. मग काही तासातच माझी पक्षातून हकालपट्टी कशी काय होऊ शकते? बहुदा असं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलं आहे. याची कल्पना स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना नसावी, असंही आढळराव पाटील यांनी
प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!