तालीबानी पद्धतीने हत्या करणाऱ्या धर्मांधांवर कठोर व तात्काळ कारवाई करावी! – कुडाळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी
*🟥तालीबानी पद्धतीने हत्या करणाऱ्या धर्मांधांवर कठोर व तात्काळ कारवाई करावी! – कुडाळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 कुडाळ, दि.:३० जून*
दहा दिवसांपूर्वी उदयपूर, राजस्थान येथे नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमावर प्रसारीत केली या कारणासाठी कन्हैयालाल तेली या टेलरींगचे काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीची अतिशय क्रूरपणे, त्यांचा गळा चिरुन दोन धर्मांध मुसलमान व्यक्तींनी निघृण हत्या केली. त्यांनी हत्येची जबाबदारी स्विकारुन घटनेचा व्हिडीओही प्रसारित केला.
नपूर शर्मा यांचे सर्व प्रकरण न्याय प्रविष्ट असताना, धर्माधांकडून स्वत: कायदा हातात घेऊन असे कृत्य या देशात होते ही धक्कादायक गोष्ट आहे. ही पोस्ट केल्यापासून मागील अनेक दिवस कन्हैयालाल यांना वारंवार ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. कन्हैयालाल यांनी यासंदर्भात पोलीसात तक्रार केली होती. या धमक्यांमुळे त्यांनी त्यांचे दुकानही उघडले नव्हते. १० दिवसानंतर २८ जूनला त्यांनी दुकान उघडल्यावर त्यांची हत्या करण्यात आली.
सदर हत्या ही कोणा एका व्यक्तीची हत्या नसून तो हिंदु धर्मावर केलेला आघात आहे. सदर आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे, ती मिळाली नाही तर असे प्रकार या देशात जागोजागी घडतील. व त्यामुळे समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल.
या सर्व प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयद्वारे होऊन सदर दोन धर्मांध मुसलमान आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना व धर्मप्रेमी हिंदूंच्यावतीने करण्यात आली. वरील मागणीचे निवेदन कुडाळ तहसिलदार श्री. अमोल फाटक यांच्यामार्फत भारताचे पंतप्रधान व केंद्रीय गृहखाते यांना देण्यात आले.
यावेळी सर्वश्री विवेक पंडित,गुरूदास प्रभू, केशव माडये, प्रकाश बरगडे, किशोर सरनोबत, प्रथमेश परब, घनश्याम परब, प्रवीण सावंत, माधवजी भानुशाली, उदय आईर, दैवेश रेडकर,साई प्रसाद मसगे, रमाकांत नाईक, प्रथमेश धुरी,राज वारंग, प्रकाश प्रभू आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_