कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पेंडूर सरपंच श्रीमती गीतांजली गुंडू कांबळी अपात्र

*🟥 कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पेंडूर सरपंच श्रीमती गीतांजली गुंडू कांबळी अपात्र*

*🟥 विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे आदेश*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 वेंगुर्ला दि.:२९जून*
. कर्तव्यात कसूर करून सरपंच पदाचा गैरवापर केल्याबाबत पेंडूर (वेंगुर्ला) ग्रामपंचायत सरपंच श्रीमती गीतांजली गुंडू कांबळी यांना अपात्र ठरविण्यात आले आहे याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त कोकण विभाग नवी मुंबई यांनी पारित केले आहेत
झिलू बाबाजी गावडे, रा. पेंडूर यांचे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी, पंचायत समिती वेंगुर्ला यांनी चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना सादर केला होता, सदर अहवालाच्या अनुषंगाने श्रीम. गितांजली गुंडू कांबळी, सरपचं ग्रापं पेंडर, ता. वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग यांनी ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत कागदपत्रांची तपासणी त्यांच्या प्रती व त्यांचा शोध नियम १९६३ मधील ४(२) मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांचे विरुध्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३९ (१) अन्वये कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ला परिषद सिंधुदुर्ग यांनी या कार्यालयाकडे सादर केलेला होता
सदर प्रकरणी अधिनियमातील तरतुदीनुसार रितसर चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना दि. ०८.०९.२०२० रोजी आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दि. १२.११.२०२० व दि.०४.०३.२०२१ रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर केला आहे.
प्रस्तुत प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी संबंधीतांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी दि. १५.०२.२०२२ रोजी विभागीय आयुक्त, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीस मुख्यकार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रापं), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), पंचायत समिती वेंगुर्ला, विद्यमान व तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचायत पेंडूर उपस्थित होते. अर्जदार गैरहजर होते व गैरअर्जदार श्रीम. गितांजली गुंडू कांबळी, सरपचं ग्रापं पेंडुर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग उपस्थित होते व त्यांचे वतीने वकील एम. बी. परब उपस्थित होते.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना सुनावणीच्या वेळी संबंधित •अर्जदार आणि गैरअर्जदार यांनी सादर केलेल्या मौखिक युक्तिवादाच्या अनुषंगाने संबधिताना त्यांचे लेखो म्हणणे विभागीय आयुक्त कार्यालयास १० दिवसात सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने •अर्जदार आणि गैरअर्जदार यांनी सादर केलेले त्यांचे म्हणणे सादर केले
ग्रामपंचायत नमुना नं.८ सन ६७/६८ या इमारत क्रमांक ५१७ चा उतारा, इमारत क्रमांक ५१७ इमारत श्री. धोंडू लक्ष्मण तांडेल यांच्या नावावर असल्याचा दाखला दिलेला आहे. प्रत्यक्षात नमुना नं.८ वर सन १९६७/६८ मध्ये इमारत क्रमांक ५१७ मालक सदरी श्री. बाबू लक्ष्मण आसोलकर असे नाव नमुद आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत कागदपत्रांची तपासणी त्यांच्या प्रती व त्यांचा शोध नियम १९६३ मधील ४(२) अन्वये रितसर कार्यवाही करणेची आवश्यकता असताना तशी सरपंच यांनी कारवाई केली नाही. सबब, ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३८ नुसार कर्तव्यात कसुरी केल्याचे दिसून येते.
सुनावणीच्या वेळी संबंधितांनी सादर केलेल्या कागदपत्र, ग्रामपंचायतीचे दस्तऐवज व
मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे अहवालाचे अवलोकन करता खालील बाबी
निदर्शनास येतात.
> ग्रामपंचायत मासिक सभा दि.२५.७.२०१९ ठराव क्रं. २९७ (१) ने ग्रामरोजगारसेवक यांचे मानधन अदा करणेबाबत मंजुरी देण्यात आलेली दिसून येते. तसेच गटविकास अधिकारी पं.स. वेंगुर्ला यांचे दि. २३.३.२०२० रोजीचे लेखी निर्देश असताना व ग्रामसेवक यांनी धनादेश क्रं.०२५९३६. दि.१५.५.२०२० वर सही केली असताना सुध्दा सरपंच यांनी धनादेशावर स्वाक्षरी केलेली दिसून येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्रं. ३) कलम १५२ अन्वये वरिष्ठांनी निर्देश देऊनही सदर आदेशाचे पालन सरपंच यांनी केलेले नाही. यावरून सरपंचानी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) कलम ३८ मधील तरतुदीचे उलंघन केल्याचे दिसून येत आहे.
श्रीम. गितांजली गुंडु कांबळी, सरपंच, ग्रामपंचायत पॅडुर, ता. वेंगुर्ला यांनी श्री. संतोष धोंडु तांडेल यांना ग्रामपंचायत नमुना नं. ८ सन ६७/६८ चा इमारत क्रमांक ५१७ चा उतारा श्री. धोंडु लक्ष्मण तांडेल यांच्या नावावर असल्याचा दाखला स्वतःच्या स्वाक्षरीत दिलेला आहे. प्रत्यक्षात नमुना नं.८ वर सन १९६७/६८ मध्ये इमारत क्रमांक ५१७ मालक सदरी श्री. बाबू लक्ष्मण आसोलकर असे नाव नमुद आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत कागदपत्रांची तपासणी त्यांच्या प्रती व त्यांचा शोध नियम १९६३ मधील ४(२) अन्वये रितसर कार्यवाही करणेची आवश्यकता असताना तशी सरपंच यांनी कारवाई केलेली दिसून येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ( १९५९ चा मुंबई अधिनियम क्रं. ३) कलम ३८ नुसार सरपंच यांनी कर्तव्यात कसुरी केली आहे. या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे अहवालाशी मी सहमत आहे.
सबब मी. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रं. ३) कलम ३९(१) नुसार बडतर्फी कारवाई करण्यात आली
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!