कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी–अतिरीक्त पोलीस अधीक्षक नितीन बागाटे

*🟥अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी–अतिरीक्त पोलीस अधीक्षक नितीन बागाटे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२४ जून*
अंमली पदार्थांविरोधात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्यान, अभियान असे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. त्यांच्या दुष्परिणामांची माहिती सर्वत्र पोहचवावी, असे निर्देश अतिरिक्त पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी दिले. जिल्हा पातळीवर अंमली पदार्थांचे सेवन व वापराविषयी परिणामकारक प्रतिबंधासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक आज झाली.
याबैठकीस प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक अभिषेक पाल, सहाय्यक डाक घर अधिक्षक विनायक कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
सर्व विभागांचा आढावा घेऊन श्री. बगाटे म्हणाले, पोस्ट विभागाने तसेच कृषी विभागाने संशयास्पद पार्सलची आणि लागवडीची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी. महसूल विभागाने आपल्या यंत्रणांमार्फतही आपल्या विभागातील लागवडीवर लक्ष ठेवावे. घनदाट अरण्याच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून तसेच अन्य • खबऱ्यांच्या मार्फत लक्ष ठेऊन गांजाच्या लागवडीबाबत खात्री करावी.
गांजाचा जमिनीवर कसा परिणाम होतो. तसेच अंमली पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामाबाबत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांमधून जनजागृती करावी. विविध स्पर्धा अभियानाच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करावी.
दोडामार्ग तालुक्यात विशेषतः घनदाट जंगलात सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून पडताळणी करावी. कृषी विभागाने आणि महसूल यंत्रणेने याबाबत पोलिसांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!