कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पर्यटनासाठी कॉफी टेबल म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे ; डी के सावंत

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-११ :-* गेली कित्येक वर्ष आम्ही ऐकतोय कॉफी टेबल. मागे पण असेच एक कॉफीटेबल काढले गेले. लाखो रुपये खर्च केले. सगळ्यांनी मिळून ,मिरवून घेतले. पण त्याचा कोकणच्या पर्यटन विकासासाठी काही उपयोग झाला असे दिसले नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा माहिती पुस्तिका प्रति ४०,००० व सी डी काढल्या गेल्या असे ऐकले पण त्या कुठे पर्यटकांच्या हातात दिसल्या नाहीत. अशामुळे विशेषता कोकणात पर्यटन वाढणार नाही. आमच्या सारखी माणसं गेले तीस चाळीस वर्ष पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी झटत असून सुद्धा यांचे एक कॉफीटेबल कधी बघितलं नाही. ते सर्वसामान्य पर्यटकांकडे कसे पोहोचणार? फक्त शासनाचा पैसा खर्च करायचा फोटो काढून मिरवून घ्यायचे बस आणि परत विसरून जायचे असा आरोप पर्यटनवाढीसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते डी,के,सावंत यांनी केला आहे.

मुळात पर्यटन व्यवसाय हा सातत्य, मेहनत व प्रामाणिक पणावर अवलंबून आहे. परंतु आपल्याकडे निदान सिंधुदुर्गात तरी शासन प्रशासन व MTDC च्या बाबतीत त्याचा अभाव आहे. कारण MTDC व जिल्हा माहिती कार्यालय अपुरी व दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठांना देतात. परीणामी वस्तुस्थिती काय याबाबत वरीष्ठ शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असतात. पर्यटन विकासाच्या आपण मोठ्या गमजा मारत आहोत. पण आतापर्यंत गेल्या पंचवीस वर्षात आपण कुठे आहोत? इतक्या वर्षात पर्यटन व्यवसायिकांची एकही बैठक, आठ दिवस पूर्व नोटीस देऊन, वारंवार मागणी करूनही, कोणीही बोलावली नाही. सर्वसामान्यांच्या सहभागाशिवाय सिंधुदुर्गात तरी पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होईल हे स्वप्न समजावे असे डी के सावंत यांनी म्हटले आहे.

स्थानिकांना कसलेच प्राधान्य नाही. स्थानिकांच्या अडचणींसाठी कोणी नाही. एमटीडीसी फक्त निवास न्याहारी धारकांकडून पैसे वसूल करते. अधिकारी नोंदणी करण्यासाठी चिरीमिरी घेऊन दिवस ढकलतात. परंतु त्यांच्या अडीअडचणी कडे कधीच लक्ष देत नाहीत. प्रकल्प अधिकारी येतात ते आपले खिसे भरून जातात. शासनाकडून आलेला पैसा कुठे जातो? त्याचा विनियोग कुठे होतो? याचा थांगपत्ता नाही.” पब्लिक मेमरी शॉर्ट” असल्यामुळे जनता लवकर विसरून जाते. प्रकल्पांतर्गत आलेला निधी भ्रष्टाचाराने या अधिकाऱ्यांच्या खिशात जातो याचा शोध निश्चितच लावला गेला असता. परंतु सगळे मिळून आपापले स्वार्थ साधत आहेत. त्यांना पर्यटन विकासाशी काहीही देणे घेणे नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते. मग पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होणार कसा?असा आरोप केला आहे.

सिंधुदुर्गात आज जो पर्यटन व्यवसाय दिसतो तो स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या जिद्द व मेहनती मुळे. त्यानी प्रसंगी दागदागिने विकून/कर्ज काढून भांडवल उभे करुन तग धरुन आहेत.

यासाठीच पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी स्थानिक व्यावसायिकांशी संवाद हवा तोही जिल्ह्यातच. उंटावरून शेळ्या हाकुन पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होणार नाही असे डी के सावंत यांनी म्हटले आहे.

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!