कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रवडे ग्रामपंचायत येथे सरपंच हरी वारंग यांच्या तर्फे आयोजित*मालवणी कवितांचा मिरगवणी आणि मालवणी गजाली हा नकलांचा कार्यक्रम संपन्न

*🟥निरवडे ग्रामपंचायत येथे सरपंच हरी वारंग यांच्या तर्फे आयोजित*मालवणी कवितांचा मिरगवणी आणि मालवणी गजाली हा नकलांचा कार्यक्रम संपन्न*

*🟥निरवडे ग्रामपंचायत व मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन यशस्वी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴 सावंतवाडी, दि.:९ जून*
निरवडे ग्रामपंचायत व मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने निरवडे येथे संपन्न मिरगवणी आणि मालवणी गजाली या कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुका विभागाच्या कवी संमेलनात तालुक्यातील मालवणी कवींनी आपल्या मालवणी कविता व मालवणी गजाली सादर केल्या. निरवडे सरपंच हरी वारंग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या सहित शालेय विद्यार्थीनी व शालेय शिक्षिक, शिक्षिका तसेच शासकीय व खाजगी नोकरदार युवक-युवती, महिला व पुरुष यांनी आपल्या स्वलिखित व अन्य कविंच्या कवितांचे वाचन करुन हे कवी संमेलन यशस्वी केले.या कवी संमेलनात कवितांसहित उपस्थित कवी व नाटककार ,नकलाकार यांनी नकला सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले.
या कवी संमेलनावेळी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील,नायब तहसीलदार मनोज मुसळे,निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे,माजी सरपंच सदा गावडे,
कोकण मराठी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष अॅड. श्री. संतोष सावंत,सहसचिव राजू तावडे आदी तसेच पत्रकार अभिमन्यू लोंढे,प्रा. गोवेकर सर, कवी दादा मडकईकर,विठ्ठल कदम, मधुकर घाडी, भरत गावडे, मुकुंद परब, तेजस बांदिवडेकर, संदीप पांढरे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक,राजू तावडे,नाना कांबळी,सुधा देवण,सुखदेव राऊळ,
रितेश राऊळ,तेजस बांदिवडेकर
मेघना राऊळ, दीपक पटेकर
तन्वी पाटकर, देवयानी आजगावकर,सुहासिनी सडेकर,त्रिंबक आजगावकर गुरुजी यांच्या सहित, कु. संचिता निर्गुण,कु.साईशा गिरीश फटनाईक, कु. पुर्वा बापू निर्गुण,कु.सीमा बापू निर्गुण, कु.मानसी परेश दळवी
यांनी आपले कवित्व सादर केले.
यावेळी राजू तावडे यांनी “मालवणी भाषेचो थोरवो”,दादा मडकईकर यांनी ” पळस फुललो रानात” या कविते सहित अनेक स्वलिखित व गाजलेल्या सुरस कविता तर मुकूंद परब यांनी “मुंबैक गेलो रामगो” ही नक्कल, नाना कांबळी यांनी “पक्षी व प्राण्यांचे आवाज,
सुधा देवण यांनी “कोकणमाते तुका रक्षिण्या” हे गाणे, तर पत्रकार सुखदेव राऊळ यांनी पावसावरील ” वारो आणि पावसाक गाऱ्हाणा ” ही कविता,
रितेश राऊळ याने “माझा मळगांव” ही कविता, तेजस बांदिवडेकर यांनी नक्कल,
प्रा. सुभाष गोवेकर यांनी कविता,
अँड. संतोष सावंत यांनी नकुल पार्सेकर यांची कविता, मेघना राऊळ यांनी गावातील एकट्या आईची व्यथा सांगणारे गाणे,
प्रज्ञा मातोंडकर यांनी फुगडी गीते व ओव्या, दिपक पटेकर यांनी पावसावरील कविता,
तन्वी पाटकर हिने नाटुकली,
मंगल नाईक हिने पावसावरील कविता,देवयानी आजगावकर यांनी मिरग कविता, सुहासिनी सडेकर यांनी कविता, त्रिबंक आजगावकर यांनी जावयाची नक्कल आदी सादरीकरण केले.
या मिरगवणी कवी संमेलन व मालवणी गजाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. संतोष सावंत यांनी तर राजू तावडे यांनी मालवणी भाषेचा विकास व मालवणी भाषेचा वापर याबाबत विचार मांडले. तर सरपंच हरी वारंग यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात “पोटात असलेले ओठांवर येवंक” असे आवाहन केले. तर नायब तहसीलदार मनोज मुसळे यांननी “मालवणी भाषा व मालवणी कविता मोठी करुया व या साठी मालवणी भाषेचा वापर व प्रेम वाढवा”असे आवाहन केले. तर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी “या व अशा कवी संमेलनात उपस्थित सहभागी कवी व मान्यवर यांना कवितांचे पुस्तक व झाडाचे रोपटे भेट म्हणून द्यायला हवे” असे आवाहन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!