दोडामार्ग मधील वन हत्तींच्या समस्येवर तोडगा निघणार..
🟥 दोडामार्ग मधील वन हत्तींच्या समस्येवर तोडगा निघणार..
🟥 मुख्यमंत्र्यांनी दिल्या वनविभागाला महत्वाच्या सुचना..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०७ :- दोडामार्ग तालुक्यातील केर, मोर्ले, हेवाळे या व इतर गावात मागच्या 22 वर्षांपासून असलेल्या हत्तींच्या उपद्रवाच्या गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे यांनी यापूर्वीच दखल घेतली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन संरक्षक श्री.सुनील लिमये यांना सदरहू समस्येची पाहणी करण्याकरिता दोडामार्ग येथे पाठविले होते.
त्याअनुषंगाने काल दि.06 जून रोजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलाविली होती.
दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली.
सदरहू बैठकीला पर्यावरण मंत्री मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायकजी राऊत व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव )पश्चिम , मुंबई, क्लेमेंट बेन ,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक मल्लिकार्जुन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर,वाय एल पी राव आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_