कोकणमहाराष्ट्रसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजगाव डीएड कॉलेजचे प्राचार्य अमृतलिंगराव माळगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालक यावेळी तरी दाखवणार काय.

*🟥आजगाव डीएड कॉलेजचे प्राचार्य अमृतलिंगराव माळगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालक यावेळी तरी दाखवणार काय…?*

*🟥खोटे जात वैधता प्रमाणपत्र, रेशनकार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करुन महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपये उकळणाऱ्या माळगे यांची वसुली करण्याचे धाडस शासकीय अधिकारी दाखवतील काय?*

*🟥शिक्षण खाते महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या रडारवर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी, दि.:२७ मे*
आजगाव डीएड कॉलेजच्या प्राचार्य अमृतलिंगराव नागप्पा माळगे यांचे प्रताप म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेला काळीमा फासणारा आणि आपल्या पदाचा सातत्याने दुरुपयोग करणारा एक प्रचंड खोटारडा प्राचार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली दोन दशके लोककल्याण शिक्षण संस्थेला आणि शिक्षण खात्याला आपल्या कुट बुद्धीने मॅनेज करून आपली बोगस नोकरी टिकवण्यात आतापर्यंत यशस्वी ठरला आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांच्या सतर्कतेने प्राचार्य अमृतलिंगराव माळगे यांचे सर्व काळे कारनामे आता मीडियासमोर आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुस्ताक शेख यांनी आपल्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्राचार्य माळगे यांनी महाराष्ट्र राज्याचे जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ सादर करावे अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत व सदर प्रकरण शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर कार्यालयाकडे वर्ग केले आहेत
*”शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यावेळी तरी ‘बनेल प्राचार्य माळगे’ आणि त्यांना आतापर्यंत पाठीशी घालणाऱ्या संस्थेवर योग्य कार्यवाही करणार का..?”- पूछता है महाराष्ट्र…!!!*
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आता माळगे यांनी महाराष्ट्र राज्याचे जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ सादर केले तरच प्राचार्य माळगे हे नोकरी टिकवण्यात यशस्वी ठरतील. अन्यथा त्यांच्यावर भारतीय दंड संहिता ४२० अन्वये शासन आणि संस्था यांना फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत प्राचार्य माळगे यांनी आपल्या तरबेज बुद्धीने शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यांना आर्थिक साटेलोटे व विविध नियमांच्या आणि संधींच्या अनुषंगाने टोलवाटोलवी देत कशीतरी आपली नोकरी टिकवली आहे. परंतु प्राचार्य माळगे यांचा खोटारडेपणा आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातचं नव्हे तर महाराष्ट्र राज्यात *”एक प्राचार्य जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे आणि जात वैधता प्रमाणपत्र कर्नाटक राज्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सादर करतो आणि त्याचे वर्षानुवर्षे शिक्षण खाते वेतनही सुरू ठेवते…!”*
ही बाब सर्वश्रुत झाली आहे. प्राचार्य माळगे आणि त्यांचे खोटे कारनामे वाचकांसमोर आलेलेत आहेत.
पण आतापर्यंत प्राचार्य माळगे यांना पाठीशी घालणारी लोककल्याण शिक्षण संस्थेमधील काही मंडळी आणि शिक्षण खात्यातील काही भ्रष्ट अधिकारी मंडळी यांच्यावरही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि सावंतवाडी कृती संघर्ष समिती तसेच हे प्रकरण ज्यांनी उघडकीस आणले ते राकेश पाटील यांना साथ देणारे महाराष्ट्रातील तमाम सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते या सर्वांची नजर आता *शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर* यांच्या निर्णयावर लागून आहे.
आतापर्यंत प्राचार्य माळगे यांना अनेकदा संधी देऊनही प्राचार्य माळगे महाराष्ट्र राज्याचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात असफल ठरले आहेत. कारण ते महाराष्ट्राचे नाहीतच ही बाब आता जनतेसमोर निदर्शनास आली आहे.
असे असताना आतापर्यंत शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाने त्यांना जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सादर करणे बाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. आता कदाचित ही शेवटची संधी असावी, कारण प्राचार्य माळगे हे चार वर्षांनी सेवानिवृत्त होत आहेत. असे असताना खोट्या कागदांवर एक कर्नाटकी प्राचार्य महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र शासनाचा कोट्यावधी रुपयाचा पगार घशात घालतो ही बाब महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी लाजिरवाणी आहे. *ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात ठेवले जाते, त्याच छत्रपती शिवरायांना कर्नाटक राज्यामध्ये कशा पद्धतीने विटंबना केली जाते. म्हणून कर्नाटकाच्या एखाद्या खोटारड्या व्यक्तीला महाराष्ट्रात मानसन्मान देणे, किंबहुना त्याच्या खोटारडेपणा लक्षात येऊनही त्याला नोकरीत संरक्षण देणे हे एक महाराष्ट्र-धर्म कधीही सहन करणार नाही..!”*
आता शिक्षण उपसंचालक प्राचार्य माळगे यांच्यावर नियमानुसार आणि संविधानाच्या चौकटीत राहून कार्यवाही करण्याचे धाडस दाखवणार काय..?
असा खडा सवाल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विचारला जात आहे.
*पाच वर्षे अनुभव नसताना प्राचार्यांचे ॲप्रुवल (मान्यता) दिलीच कशी..?*
प्राचार्य माळगे यांच्या बाबत अजून एक भयावह सत्य समोर आले आहे ते म्हणजे प्राचार्य माळगे यांना अध्यापनाचा 5 वर्ष पूर्ण अनुभव नसताना NCTE चे निकष व महाराष्ट्र शासनाचे निकष डावलून पाच वर्षे अनुभव नसतानाही प्राचार्यपदाची संस्था नेमणूक करते आणि त्या नेमणुकीला तत्कालीन शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाने मान्यताही प्रदान करते ही बाब पुन्हा एकदा नियमांना अनुसरून नाही. याचाच अर्थ असा की प्राचार्य माळगे यांचे असे कोणते नाजूक संबंध शिक्षक उपसंचालक कार्यालय आणि संस्थेशी जुळले आहेत ही ज्यामुळे प्राचार्य माळगे यांच्या सर्व खोटारडेपणाला संस्थाचालक आणि शिक्षण खाते पाठीशी घालत आहे..
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नेमके करते तरी काय..?*
प्रत्येक जिल्ह्यात अध्यापक विद्यालयाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट* ही संस्था कार्यरत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओरोस येथे डाएट कार्यरत आहे. प्राचार्य माळगे यांच्या जातवैधता प्रमाणपत्र आणि एकूण मनमानी कारभाराबद्दल स्थानिक सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वेळोवेळी डाएट प्राचार्यांकडे रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. मात्र असे असताना डाएट प्राचार्य यांनी गेल्या दहा वर्षात किती वेळा आजगाव अध्यापक विद्यालयाला भेटी दिल्यात…?कोणकोणत्या प्रकरणाची रीतसर चौकशी केली..? याचासुद्धा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मागणार आहेत.
तसेच मंत्रालय स्तरावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याचा जाब विचारला जाणार आहे.
*चौकशीला आजगाव येथे आल्यावर डाएट प्राचार्य केवळ शिरोडा येथील मासे खाण्यात तल्लीन असतात की काय..?* अशीही स्थानिक लोकांमध्ये चर्चा रंगलेली आहे. महाराष्ट्र शासनाची नोकरी खोट्या दाखल्यांवर मिळवून करोडो रुपयांचा पगार घशात घेणारा प्राचार्य डाएटच्या प्राचार्यांच्या घशात फक्त मासे घालतो आणि त्यांना खुश ठेवण्यात यशस्वी होतो..!
हा सगळा सावळा गोंधळ लवकरच मीडियातून मधून आपल्यासमोर येणार आहे.
*माझी बायको हट्ट करत होती म्हणून मी तिला अनुभवाचे खोटे दाखले दिले- प्राचार्य माळगे*
स्वतःच्या बायकोला एम. एड. हा कोर्स करण्यासाठी खोटे अध्यापनाचे अनुभव दिल्यावर संस्थेने प्राचार्य माळगे यांना जाब विचारल्यावर प्राचार्य माळगे असे म्हणतात की *” माझी बायको रोज मला शिक्षण घेण्यासाठी हट्ट करत होती म्हणून तिच्या हट्टापायी मी तिला शिकविण्याचे दोन खोटे दाखले दिले आहेत..!”*
स्वतः माळगे यांच्या या लेखी कबुलीवरून हा प्राचार्य मानावा की काय..?
असा प्रश्न सामान्य व्यक्तीच्या मनात निर्माण होतो.
*माळगे यांचे प्रशासनाचे काळे कारणामे-*
2003 साली जेव्हा पासून प्राचार्य माळगे यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून त्यांचे अनेक काळे कारणामे आमच्या हाती आले आहेत. विद्यार्थ्यांचे आर्थिक, आणि टिंब टिंब टिंब शोषण करण्यासाठी प्राचार्य माळगे यांनी आपल्या प्राचार्य पदाचा गैरवापर केला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
______________________
🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*
👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*
🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*
🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*
👨‍⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.
🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*
👌 *वैशिष्ट्ये-*
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*
😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*
👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
🎥 *https://bit.ly/3LPKlPj*
👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*

☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*
9145229999 / 9145339999
👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*
🎯 *मुतखडा साठी*
*स्मॅश स्टोन*
*(औषधाचे रिझल्ट बघा)*
*https://bit.ly/3sh8qr2*
🎯 *सांधेदुखी साठी*
*वेदना हर ऑईल व चुर्ण*
*https://youtu.be/qdwCwLPOqU8*
🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*
*_______________________*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!