चिपळूण मुस्लीम समाज कार्यालयाला प्रशांत यादव यांची सदिच्छा भेट
🟥चिपळूण मुस्लीम समाज कार्यालयाला प्रशांत यादव यांची सदिच्छा भेट
🟥आपत्ती काळात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,१६मे: चिपळूण मुस्लीम समाजाच्या कार्यालयाला आज सकाळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी सदिच्छा भेट दिली. मुस्लीम समाजाने कोरोना आणि महापूर यांसारख्या आपत्तीच्या काळात केलेल्या कार्याचा यादव यांनी यावेळी गौरव केला. समाजातील ही एकी कायम राहावी, अशा शुभेच्छाही यावेळी यादव यांनी दिल्या.
यावेळी चिपळूण मुस्लीम समाजाच्या कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष नाझीम अफवारे यांच्या हस्ते प्रशांत यादव यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी यादव यांनी चिपळूण मुस्लीम समाजातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे आणि कार्याचे कौतुक केले. कोरोना तसेच महापुराच्या काळात कोणतीही प्रसिद्धी न करता चिपळूण मुस्लीम समाजाने केलेले काम कौतुकास्पद आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत कोणताही जाद-धर्म न पाहता प्रत्येक वेळी सगळ्यांत आधी मदतीचा हात देण्यासाठी चिपळुणातील मुस्लीम समाज पुढे आला, हे प्रशासनासह सगळ्यांनाच मान्य करावे लागले, अशा शब्दांत यादव यांनी यावेळी कौतुक केले. चिपळूण मुस्लीम समाजाच्या विधायक कार्यात आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाहीही यावेळी प्रशांत यादव यांनी दिली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुलजार कुरवले यांचाही चिपळूण मुस्लीम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी चिपळूण मुस्लीम समाजाच्या कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष नाझीम अफवारे, खजिनदार रऊफ वांगडे, फैय्याज देसाई, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक करामत मिठागरी, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, याकूब सय्यद, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, चिपळूण मुस्लीम समाजाचे मुराद अडरेकर, आशिक हमदुले, वहाब सुर्वे, खालिद दाभोळकर, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.
———————————————————–
*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिके%

