सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांचा वापर थांबविण्यासाठी महत्वाच्या विभागाची ऑनलाइन बैठक
*🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांचा वापर थांबविण्यासाठी महत्वाच्या विभागाची ऑनलाइन बैठक..*
*🟥 अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ऑनलाइन बैठकीत अमली पदार्थांच्या विरोधात उचलली ठोस पावले..*
*🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला मोठे यश..*
*🟥 अल्पावधीत करोडपती झालेल्या शफिक शेमनचे पितळ उघडे पडणार..कारविल्डकर कंपनीही रडारवर..*
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१० :-* कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चा अवैध धंद्या विरुद्धच्या लढ्याला यश मिळत असून अमली पदार्थ विरोधात जनजागृती करून त्यांच्या परिणामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी अशी सूचना अतिरीक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ऑनलाइन बैठकीत दिली, जिल्हापातळीवर अमली पदार्थांचे सेवन व वापराविषयी परिणामकारक प्रतिबंधासाठी च्या जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वैभव वैद्य, कुडाचे तहसीलदार अमोल पाठक, नारकोटिक्स विभागाचे विजय शिंदे, कष्टम विभागाचे गौरव कुमार, अमोल चित्रांश,केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अभिषेक पाल,सहाय्यक अधीक्षक विनायक कुलकर्णी, आदींनी सहभाग घेतला.
अमली पदार्थांचे वाढते अतिक्रमण पाहता सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगून श्री बागाटे म्हणाले सध्याच्या परिस्थितीत अंमली पदार्थांच्या तस्करी वाढत असताना दिसत आहे, ग्रामीण भागापर्यंत अंमली पदार्थ पोहोचवली जात आहेत ,याला प्रतिबंध करणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रत्येक विभागाने कार्यवाही करावी, कृषी विभागाने गांजा सारख्या पिकाची लागवड रोखण्यासाठी कार्यवाही करावी, या पिकांच्या दुष्परिणामांबाबत शेतकऱ्यांना मेळाव्याच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी,कष्टम विभागाने अंमली पदार्थांच्या तस्करी बाबत जास्त जागरूक राहून कार्यवाही करावी, परराज्य लागून असलेल्या जिल्ह्यात तसेच बंदर या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून कार्यवाही करावी त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर करावा,पोस्ट विभागाने पार्सलची नियमितपणे तपासणी करावी अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. व खऱ्या अर्थाने गेले दोन वर्ष कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल व चिरफाड पोर्टल चे सुनिल पेडणेकर यांनी संयुक्तपणे याविरुद्ध लिखाण केले होते त्याला यश आल्याचे आजच्या बैठकी वरून दिसून आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून तसेच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची घुसखोरी होत आहे व याला स्थानिक काही शफिक शेमन सारखी माणसे दलाली करून हातभार लावत आहेत, आम्ही यावर वारंवार लिखाण केले होते ,रस्त्यावर कटलरी विकणारा माणूस वर्षभरात जर करोडपती होत असेल तर अशी कोणती त्याच्याकडे जादूची कांडी आहे . त्याची माहिती त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना द्यावी अशी मागणीही आम्ही त्या वेळी केली होती, मात्र अंमली पदार्थांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला घट्ट विळखा पडू लागल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली असे म्हणायला काही हरकत नाही.
आम्ही यावर वारंवार लिहित असल्याने काही जणांनी कुठे आहे गांजा? कुठे आहे चरस?अशी टर उडवायला सुरुवात केली होती. मात्र कॉलेज मुलांकडे मिळालेला गांजा, गोव्यात शेख तर सावंतवाडीत बेग यांच्या कडे तीन किलो मिळालेला गांजा, तरुण वयात मुले करत असलेली आत्महत्या यामागे गांजा व अमली पदार्थ सारखेच व्यसन असल्याचे आम्ही केलेल्या तपासात निष्पन्न झाल्यानेच आम्ही या विरुद्ध गेली दोन वर्ष लढा देत होतो, मात्र स्थानिक वृत्तपत्रे , चॅनल,यू ट्यूब चॅनल याबाबत एक अवाक्षरही काढत नव्हते,मात्र कोणाचीही मुलाहिजा न ठेवता आम्ही याबाबत वारंवार लिखाण केले ,काही नी शफीक शेमन कडून मिळणाऱ्या जाहिराती साठी त्याची बाजू घेऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची आमची अवलाद नसल्याने आम्ही असल्या या आमिषाला बळी पडलो नाहीत व पडणार ही नाही.
अमली पदार्थांचे लोन कधी कुणाच्या घरात घुसतील हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाने याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे, राजकीय पक्ष तर झोपेचे सोंग घेऊन झोपी गेलेले आहेत,जर एखादा खरोखर झोपलेला असेल तर त्याला उठवता येते,मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसे उठवणार हाच मोठा प्रश्न आहे, मात्र एक दिवस या भागातील जागृत देवता असे झोपेचे सोंग घेणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना राजकारणातून कायमचे उठवतील हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. मी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी याबाबत ठोस पावले उचललीत… फक्त परराज्यात सीमा न तपासता महाविद्यालयांची मुले ,खाजगी हॉस्टेलची मुले ,यांच्या तपासण्या होणे गरजेचे आहे,कारण अमली पदार्थांचे दलाल आहेत ते अशाच मुलांना आपले सावज बनवतात त्यामुळे या धंद्याचे समूळ उच्चाटन करायचे असेल त्याच्या मुळाशी घाव घालने गरजेचे आहे असे आमचे ठाम मत आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_