केंद्राच्या लेबर कोडमधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाची तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने..
▪️तरतुदीत तात्काळ मागे घ्या, अन्यथा याहिपेक्षा मोठे आंदोलन करून सरकारला जागे करु; संघाचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२८: केंद्र शासनाने मंजूर केलेल्या लेबर कोडमधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदीत तात्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा याहिपेक्षा मोठे आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल, असा इशारा यावेळी देत तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदनव्दारे देण्यात आला.
भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाने आणलेल्या नविन कामगार कायद्यातील तरतुदीना विरोध दर्शविला आहे. कायद्यातील औद्योगीक संबंधसंहिता २०२०, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि सेवाशर्ती संहिता २०२० यातील काही तरतुदीमुळे कामगारांचे अधिकार धोक्यात येणार असल्याचे मजदूर संघाचे म्हणणे आहे. याविरोधात मजदूर संघाने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गतच येथील तहसीलदार कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. तसेच न्याय हक्कासाठी घोषणाबाजी केली मजदूर संघाच्या कार्यायाकडून सर्व पदाधिकारी व सदस्य यंनी तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी येत सोशल डिस्टंसिंग पाळत निदर्शने केली व घोषणा दिल्या. त्यानंतर श्रमिक गीत गायनाचा कार्यक्रम झाल्यावर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तहि ठेवण्यात आला होता.
भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनाला उपाध्यक्ष अशोक घाडी, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, सचिव हरी चव्हाण, कणकवली तालुका प्रमुख राजेंद्र आरेकर, वैभववाडीचे दिपक गुरव, कुडाळच्या जयश्री मडवळ, हेमंतकुमार परब, देवगडचे सत्यवान कदम, प्रकाश वाडेकर, विकास गुरव, विकास चाळके, अजित सावंत, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सल्लागार समिती सदस्य ऍड. विशाल मोहिते, भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटनमंत्री रवींद्र पुरोहित, सुनीता ताटे, शुभांगी सावंत व इतर उपस्थित होते.
कारखान्यतील ले ऑफ, कारखाना बंद करणे, कामगार कपात यासाठी शासनाच्या परवानगीची मर्यादा ३०० वरून १०० कामगार करावी, कामगारासोबतचे निश्चत कालावधीचे वैयक्तिक करार करण्याची मालकांना दिलेली परवानगी रद्द करवी. औद्योगीक स्थाई आदेश लागू होण्याची मर्यादा ३०० ऐवजी ५० कामगार करावी, कामगार संपासाठी १४ दिवसांच्या पुर्व सूचनेच्या मर्यादेत बदल करू नये. कायम स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची तरदूद केली जावी. सनदी अधिकाऱ्यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्यादीत अधिकार रद्द करावेत. कामगार संघटनेचे नोंदणी ६० दिवसांत करण्याची कालमर्यादा निश्चित करावी. महिलांना रात्रपाळीच्या कामाला बोलविण्याचा निर्णय रद्द करावा. तसेच वेतन संहिता २०१९ आणि सामाजिक सुरक्षा संहिता २०२० हे दोन्ही कायदे असंघटीत व कागाराच्या हिताचे असल्याने त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीहि मजदूर संघाने केली आहे.
केंद्राने लागू केलेल्या संहितेमधील तरतुदीमुळे कामगार संघटनेचे अधिकार काढून घेतले जाणार आहेत. यातून कामगार नाहीसे होऊन त्यांची सुरक्षितता नष्ट होईल. तसेच कंत्राटी कामगारांच्या हालाखीत वाढ होईल, असे मतऍड यावेळी . मोहिते यांनी व्यक्त केले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

