केवळ दृष्टी असून चालत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दूरदृष्टी असणे आवश्यक
*🟥केवळ दृष्टी असून चालत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दूरदृष्टी असणे आवश्यक*
*🟥निरवडे सरपंच हरी वारंग यांची मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार व शुभेच्छांबाबत प्रतिक्रिया*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.:२ एप्रिल*
केवळ दृष्टी असून चालत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला व्यसन असायला हवे.मात्र ते व्यसन कामाचे व ध्येयाचे असायला हवे. निरवडे गावाच्या विकासासाठी मी दूरदृष्टीने काम करणार असून मला जो अल्प कालावधी मिळाला आहे, त्या अल्पावधीतच या गावाला जिल्हास्तरीय स्वच्छता पुरस्कार मिळवून देणार आहे. यासाठी मला निरवडे ग्रामस्थ व विशेषतः तरुणवर्गाला मोठा हातभार लागत आहे.”अशा शब्दात निरवडे सरपंच तथा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचा विद्यार्थी हरी वारंग यांनी आपल्या ध्येयाबाबत व निर्धाराबाबतच्या विचारांना शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे पदाधिकारी व वर्ग मित्रांसमवेत वाट मोकळी करुन दिली.
सरपंच हरी वारंग याचा सत्कार करण्यासाठी निरवडे ग्रामपंचायतीला विशेष भेट दिलेल्यांमध्ये मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या विद्यमान मुख्याध्यापिका तथा या शाळेच्या माजी विद्यार्थीनी सौ. श्रद्धा सावंत अर्थात प्रमिला राणे मॅडम, या शाळेचे विद्यार्थी व विद्यमान शाळा कमिटीचे खजिनदार नंदकिशोर राऊळ, चेअरमन मनोहर राऊळ, संचालक रामचंद्र केळुसकर, शिक्षक तथा पर्यवेक्षक एम. बी. फाले सर, या शाळेचे माजी विद्यार्थी तथा कोकण रेल्वे कर्मचारी सत्यवान हरमलकर , शाळेचे माजी विद्यार्थी तथा पत्रकार सुखदेव राऊळ यांचा समावेश होता.
या सर्वांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरपंच हरी वारंग यांनी, “मी ज्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे, त्या माझ्या निरवडे गावाच्या ग्रामपंचायतीला भेट देण्याबरोबरच माझा सत्कार करणाऱ्या मी ज्या शाळेत वर्ष 1984 ते 1988 या पाच शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिकलो त्या शाळेकडून झालेला हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.माझ्या जीवनात आतापर्यंत अनेक सत्कार झाले. मात्र या सत्कारांपैकी मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या कमिटी पदाधिकारी, मुख्याध्यापिका यांनी व वर्ग मित्रांनी केलेला हा सत्कार माझ्यासाठी अन्य सर्व पुरस्कार व शाबासकी या पेक्षा खुप मोठा आहे,अशी भावना व्यक्त केली.तसेच सरपंच हरी वारंग यांनी, त्यांचा काही दिवसांपूर्वी निरवडे गावातील जाधव वाडी येथील सर्व सामान्य जनतेने जाधववाडी येथे बोलवून व ग्रामपंचायतीमध्ये येऊन केलेला सत्कारही मी कधी विसरणार नाही.तसेच मी सरपंच पदावर स्थानापन्न झाल्यानंतर मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव च्या एस. एस. सी. चॅम्पियन्स गृप 1987-88 मधील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या वर्ग मित्रांनी केलेला सत्कारही माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला असून माझे सामाजिक क्षेत्रातील आदरणीय गुरु तथा माजी सरपंच शंकर साबा गावडे उर्फ सदा गावडे यांची भेट शाळा कमिटी पदाधिकारी, मुख्याध्यापिका व वर्ग मित्रांनी माझ्या उपस्थितीत घेतल्या नंतर सदा गावडे यांच्या समोर केलेली माझ्या कार्याची व कार्य पद्धतीची स्तुती व सदा गावडे यांनी चांगला कार्यकर्ता घडविल्या बद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार माझ्यासाठी लाखमोलाचे आहेत. तसेच या सर्वानी निरवडे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन निरवडे ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय स्वच्छता अभियानात यश मिळो, अशा शब्दांत दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी केलेल्या माझ्या या सत्काराबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या या सत्काराने माझे सर्व परिचित, हितचिंतक, ग्रामस्थ, नातेवाईक तसेच माझ्या सर्व मित्रांना स्फुर्ती मिळावी अशी भावना व्यक्त केली. तसेच हरी वारंग यांनी आपले या गावाच्या विकासासाठी कशाप्रकारे योगदान असेल याबाबतची रुपरेषा स्पष्ट केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*____🥘__हॉटेल तिखट मिठ__🥪____*
*चहा नाश्त्याची उत्तम सोय*
🥘साऊथ इंडियन
● इडली सांबार
● मेदूवडा सांबार
● मसाला डोसा
● प्लेन डोसा
● पेपर मसाला डोसा
● बटर डोसा
● चीज बटर डोसा
● शेजवान डोसा
● छोले भटूरे
◆ चहा
◆ कॉफी
◆ ग्रीन टी
◆ लेमन टी
◆ शिरा
◆ उप्पीट
◆ भाजी पुरी
◆ कुर्मा पुरी
◆ भाजी पाव
◆ आंबोळी चटणी
◆ आंबोळी उसळ
◆ मिसळ पाव
◆ मिसळ पुरी
◆ तवा पाव भाजी
◆ कुर्मापुरी
◆ कुर्मा पाव
◆ झुणका भाकरी / ठेचा
*गौरव रमाकांत तुळसकर*
*📲8805425156*
*पत्ता :* आदिनारायण मंगल कार्यालय समोर,
मेनरोड, सालईवाडा,सावंतवाडी
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

