भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल शृगारे यांच्या दोनशे रुपयात पन्नास किलो कांद्याचे पोते,या उपक्रमाला उदंड प्रतिसाद
*🛑 भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल शृगारे यांच्या दोनशे रुपयात पन्नास किलो कांद्याचे पोते,या उपक्रमाला उदंड प्रतिसाद*
*🛑 कोकण लाईव्ह चे संपादक व मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी फीत कापून केला कार्यक्रमाचा शुभारंभ*
*🛑 भटवाडीतील उमलते नेतृत्व कुणाल शृगारे यांच्या उपक्रमाचे शहरात कौतुक*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:२९मार्च*
भटवाडी येथील सामाजिक, युवा कार्यकर्ते कुणाल शृगारे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांना एक अनोखी भेट म्हणजेच ५५ किलो कांद्याचे पोते फक्त दोनशे रुपयांना अत्यल्प किमतीत देऊन महागाईच्या दिवसात सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, याबद्दल सावंतवाडी शहरात कुणाल शृगारे यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे, या उपक्रमाचे उद्घघाटन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक व मराठा संघाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी फीत कापून केले.
भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता व समाजसेवेची आवड असलेला कुणाल नेहमीच आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करतो, वाढत्या महागाई बरोबर कांद्याचा उच्चांकही मध्येच वाढतो, त्यामुळे अवघ्या दोनशे रुपयात ५५ किलो कांद्याचे पोते भटवाडी वैश्यवाडा, सबनीसवाडा या प्रभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देऊन कुणाल शृगांरे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.
या उपक्रमाला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला व अवघ्या दीड तासात सुमारे तीनशे कांद्याची पोती समाप्त झाली, याप्रसंगी कुणाल शृंगारे मित्रमंडळाचे भैय्या सावंत ,राजा दळवी ,अभय खंदारे, संतोष खंदारे ,स्वप्नील कामते ,भार्गव धारणकर ,सतीश सुभेदार,ललित नाईक,रंजीत जाधव ,बाळा कावले यांनी सहकार्य केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

