ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कलतर्फे पत्रकारांचा पुरस्कार सन्मान सोहळा

🛑ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कलतर्फे पत्रकारांचा पुरस्कार सन्मान सोहळा

🛑पुरस्कारांमुळे पत्रकारांना प्रोत्साहन मिळते- पद्मभूषण देशपांडे

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती राज्य पुरस्काराने अभिमन्यू लोंढे सन्मानित

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

🎴मुंबई,दि.२९ मार्च: पुरस्कारांमुळे पत्रकारांना आपण काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळते असे मत दैनिक पुण्यनगरीचे मुख्य राजकीय संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी मुंबई येथे व्यक्त केले.
भारतीय पत्रकार मित्रांची संघटना असलेल्या ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल संघटनेच्यावतीने राज्यात पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील,ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, सकल ओबीसी समाजाच्या अध्यक्षा कांचन नाईक,मुंबईचे अध्यक्ष निसार अली सय्यद,पीपल अँड सिस्टम अलकेमी प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर क्षीरसागर,लोकशाही शिक्षक आघाडी मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले, संघटनेचे केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार,सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या(सामाजिक संस्था)सचिव वैशाली महाडिक-सय्यद उपस्थित होत्या.
या पत्रकार मित्र सन्मान सोहळ्यामध्ये पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांना जीवन गौरव पुरस्कार, कोकणातील सावंतवाडी येथील अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार, कराड येथील अतुल होनकळसे यांना नानासाहेब जोशी संपादक पुरस्कार ,अकोट येथील राहुल कुलट यांना मधुकर लोंढे पत्रकार स्मृती राज्य पुरस्कार,रत्नागिरीच्या संगमेश्वर येथील युयुस आर्ते यांना शरददादा बोरकर सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार, बार्शी येथील गणेश गोडसे यांना नवीनचंद्र सोष्टे आदर्श पत्रकार पुरस्काराने दैनिक पुण्यनगरीचे मुख्य राजकीय संपादक पद्मभूषण देशपांडे, रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यापुढे बोलताना पद्मभूषण देशपांडे यांनी, विकासाचे प्रश्न मांडण्याचे काम पत्रकारांच आहे. पत्रकारितेचे हे मूलभूत कर्तव्य आहे,हे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला आहे त्यामुळे या पत्रकारांकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे सांगून काही लोकांच्या हातात एकेकाळी मीडिया होता पण आताच्या सोशल मीडियामुळे हा मीडिया लोकांच्या हातात गेला आहे. पत्रकारिता ही २४ तास काम करण्याची गोष्ट आहे. पत्रकारिता क्षेत्रात वेगवेगळ्या पैलूवर काम करणारे पत्रकार आहेत.संघटन आवश्यक आहे .सामुहिक काम करण्याकरता संघटनांची गरज असते त्यामुळे समाज जीवन समृद्ध होते. संपूर्ण जगात पत्रकारांसाठी आव्हाने आहेत .भारतात पाहिलं तर प्रचंड विविधता आहे.अस्मितांची वेग-वेगळे क्षेत्र आहेत.टोकदार अस्मिता असल्यामुळे भारतात पत्रकारिता करणे अवघड होते. इतरांच्या प्रश्नांसाठी झगडणारा प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात टाकणाऱ्या अशा पत्रकारांना कधीही संरक्षण नसते असे सांगितले.
रायगडभूषण प्रा. एल.बी. पाटील यांनी,पत्रकारिता करणे अवघड काम आहे.आजच्या समाजामध्ये पत्रकारिता कशी सांभाळायची हा प्रश्न आहे.समाजाचं चित्र जशाच जसं मांडणाऱ्या आज पत्रकारितेची आवश्यकता आहे. स्वच्छ पत्रकारिता करणारे समाजात आज पत्रकार मिळणे अवघड झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बाळकृष्ण कासार संपादित लोकनिर्माण वृत्तपत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे नियोजन संतोष चिकणे,पंकज कपूर ,मुरगन पिल्लई,सफल विकास वेलफेअर सोसायटीचे मनोज परमार,नमिता मिश्रा,उत्कर्ष बोरले,कृष्णा वाघमारे, मेरी चेट्टी,लक्ष्मी काउंडर, शशी गुप्ता, पूजा चौहान,फिरोज अन्सारी, अफरोझ अन्सारी, अफझल शेख, निकोलस,अक्षय चौहान पटेल यांनी केले.

 

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!