२४ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याचे मिशन ऑल आऊट..
▪️२४ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना रजा घेता येणार नाही. किंवा रजेवर गेलेल्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश..
▪️या कालावधीत उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अनैतीक धंदे उद्ध्वस्त करून मुद्देमाल जप्त करून तसा अहवाल आयुक्त कार्यालयाला देण्याचे आदेश..
▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला यश..
▪️उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जारी केले आदेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.२५: या वर्षी कोव्हीड-१९ च्या सार्वत्रीक प्रादूर्भावामुळे राज्यात सर्व उदयोगधंदे बऱ्याच कालावधीपर्यंत पूर्णत: बंद होते. यात सर्व अबकारी अनुज्ञप्त्यादेखील बराच काळ बंद होत्या. परिणामस्वरुपी विभागाच्या महसुलात घट झालेली आहे. लॉकडाऊनमुळे अशा परिस्थीतीमध्ये राज्यात अवैध मद्यविक्री तसेच हातभट्टी निर्मिती व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबात कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी राज्यातील उत्पादन शुल्क अधिकार्यांना दिले आहेत व एक प्रकारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला यश आले आहे.
याबात उत्पादन शुल्क आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की उत्पादन शुल्क विभागाच्या गुन्हे अन्वेषणाच्या कामकाजामध्ये घट झाल्याचे दिसुन आलेले आहे. याविषयी अलीकडेच शासनाच्या उच्च पातळीवर आढावा घेण्यात आलेला असून हातभट्टीची दारु व सर्व प्रकारच्या अवैध मद्याच्या व्यवहाराविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. तसेच सद्यस्थितीत माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात दसरा दिवाळीसारखे महत्वाचे सण येऊ घातले आहेत. या सणासुदीच्या कालावधीत मद्याच्या मागणीमध्ये दरवर्षी वाढ होत असते. परिणामी या कालावधीत देखील परराज्यातुन विदेशी मद्याची अवैधरित्या आवक व विक्री होण्याच्या तसेच स्थानिक पातळीवर हातभट्टी, बनावट देशी/ विदेशी मद्य निर्मिती व विक्री होण्याच्या घटना निदर्शनास येण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे शासन महसुलावर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. शिवाय बनावट मद्यामुळे लोकांच्या आरोग्यावरदेखील अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सबब परराज्यातुन होणाऱ्या अवैध मद्याच्या आयातीवर व स्थानिक अवैद्य मद्य विक्रीचे समुळ उच्चाटन करणे आवश्यक ठरते असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
उपरोक्त परिस्थिती विचारात करता सदरच्या कालावधीमध्ये अनधिकृत ढाबे, हातभट्टीची ठिकाणे,बनावट मद्य, भेसळयुक्त ताडी निर्मिती इत्यादीच्या ठिकाणावर छापे घालून नियंत्रण ठेवणे व अवैध मद्याची ने-आण करणाऱ्या इसमांच्या विरुध्द प्रतिबंधाकारवाई करणे आवश्यक आहे.अशा इसमांबाबत खबऱ्यामार्फत गोपनियरित्या माहिती घेत राहणे गरजेचे आहे. विश्वासु खबऱ्यांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे विभागाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी साध्या वेषात संशयित ठिकाणी जाऊन पडताळणी करावी. तद्नंतर अवैध मद्याची, भेसळयुक्त ताडीची निर्मिती, वाहतुक व विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोबीने आवश्यकतेनुसार जिल्हयातील अधिकारी / कर्मचारी यांना सोबत घेऊन कठोर कारवाई करावी. याबरोबरच अशा अवैध मद्याच्या व्यवसायात सक्रिय असलेल्या समाजकंटक इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ९३ अंतर्गत कार्यवाही सुरु करावी. आवश्यकतेनुसार जिल्हयातील सरकारी वकीलांशी सल्लामसलत करुन अन्य कायदयांतर्गत तरतुदीनुसार संबंधिताविरुध्द गुन्हे नोंदविण्याची प्रक्रियाही पार पाडावी असे म्हटले आहे व आमची देखील मागणी हीच होती की झोपेचे सोंग आणलेल्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याना जागे करावे.
सर्व विभागीय उप आयुक्त व अधीक्षकांनी पुढाकार घेऊन ही मोहिम राबवावी. विभागीय उप आयुक्तांनी कर्तव्यदक्ष अधिकारी / कर्मचाऱ्यांचे खास पथके बनवुन गुन्हे अन्वेषण करुन, संबंधितांना अटक करुन कोठडी मिळेल याकडे व तत्सम मुद्यांकडे जातीने लक्ष द्यावे. न्यायालयात विभागाची बाजु प्रभाविरित्या मांडली जाईल याकरिता सर्व संबंधित अधीक्षकांनी विशेष दक्षता घ्यावी. दि.२४ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या मिशन ऑल आऊटच्या कालावधीत संपूर्णपणे अधिकारी / कर्मचारी हे क्षेत्रीय कामकाजात सक्रिय राहतील यासाठी अधीक्षकांनी विशेष खबरदारी घ्यावी. सदरच्या कालावधीसाठी कुठल्याही अधिकारी / कर्मचान्यास रजा मंजुर करु नये. या कालावधीत विभागीय उप आयुक्तांनी / अधीक्षकांनी स्वतः रजेवर जाऊ नये व अधिपत्याखालील अधिकारी / कर्मचारी यांना रजा मंजुर केली असेल तर ती तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच मिशन ऑल आऊट अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आयुक्त कार्यालयात सादर करावा असा आदेश दिला आहे.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_