गाव विकासासाठी चालना मिळण्यासाठी रस्ता करण्यासाठी मोफत नोंदणी करण्याची जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी
*🛑गाव विकासासाठी चालना मिळण्यासाठी रस्ता करण्यासाठी मोफत नोंदणी करण्याची जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी:१० मार्च*
जिल्ह्यातील ग्रामस्थांनी गाव विकासाला चालना मिळावी म्हणून स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनी रस्ता करण्यासाठी सातबारावर मोफत नोंद करून संबंधित शेतकऱ्याला पत्र मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यानी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे याबाबत निवेदनाची प्रत खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्त केली खासदार हे एका कार्यक्रमानिमित्त सावंतवाडी येथे दौऱ्यावर आले असता अण्णा केसरकर यांनी त्यांना निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते युवा सेना तालुकाधिकारी योगेश नाईक उपस्थित होते
अण्णा केसरकर यांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतक-यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी गावाच्या विकासासाठी गावात वाडी वस्त्यांवरील संपर्क वाढावा, आपले गाव शहराला जोडले जावे म्हणून रस्त्यासाठी मोफत दिल्या जातात. त्या रस्त्यावर शासना कडून कोट्यावधी चा खर्च करुन ते रस्ते वाहतुकीस योग्य करण्याचे काम केले आहे. ही सार्वजनिक सोय झाली. पण जो शेतकरी शेती करतो त्या शेतकऱ्याच्या पदरात शासनाकडून निराक्षा केली जाते. जी जमीन ह्या कामासाठी रस्ता करण्यतासाठी दिली जाते ती जमीन सातबारा वरुन कमी केली जात नाही. त्यामुळे कुटुंबाला जेव्हा जागेचे वाटप समान केले जाते तेव्हा रस्त्यालगतची जमीन ज्या शेतकऱ्याच्या वाट्याला येथे तेव्हा प्रत्यक्षात विकासाला दिलेल्या जमिनीची सातबारावर पुर्ण नोंद असल्यामुळे त्या शेतकल्याचे नुकसान होते. त्याला योग्य न्याय मिळत नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांच्या दप्तरी बक्षीसपत्र करुन दिल्याची नोंद होते. पण त्या शेतकऱ्याच्या मुळ मालकी हक्काच्या सातबारावरील सदर जमीनीची नोंद कमी केली जात नाही. तरी
अशा नोंद किंवा मोफत दिल्या असल्यामुळे जमिनी ज्या मुख्यमंत्री सडक योजना, विस्तारीकरण, पंतप्रधान सडक योजना, ग्रामपंचायतच्या २६ नंबर किंवा २३ नंबरच्या आधारे शासनाचा पैसा खर्च केला जातो. मग शेतकऱ्यावर अन्याय का होत आहे याची चौकशी व्हावी. सातबारावर नोंद करुन जमीन कमी करावी व तसे लेखी पत्र संबंधित शेतकऱ्याला देण्याचे आदेश व्हावेत अशी शेतकरी संघटनेच्यावतीने ह्या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत.
असे त्यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे
या निवेदनाच्या प्रती आमदार कथा तथा माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार तथा माजी राज्यमंत्री
आमदार.वैभव नाईक, सिंधुदुर्ग जि प अध्यक्ष जिल्हा परिषद विरोधी गटनेते शिवसेना जिल्हाप्रमुख यांना माहितीसाठी सादर केल्या आहेत
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*
*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*
_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_
*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)
*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)
*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-
*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

