कोकणक्रीडामहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नितीन सावंत प्रथम

🛑सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नितीन सावंत प्रथम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.९ मार्च- पंचायत समिती, सावंतवाडी च्या वतीने आयोजित अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळा आंबेगाव नं १ चे सन २०२१-२२ चा जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, कुणकेरी गावचे सुपुत्र श्री. नितीन नामदेव सावंत यांनी उंच उडी आणि लांब उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच बरोबर पुरुष लंगडी क्रीडा प्रकारात कप्तान म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
श्री. सावंत यांनी अशा प्रकारे सलग अकरा वर्षे यशस्वी वाटचाल त्यांनी अबाधित राखली आहे.
यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सलग नऊ वर्षे उंच उडी या क्रिडा प्रकारात प्राविण्य मिळविले असून पुरुष लंगडी क्रीडा प्रकारात कप्तान म्हणून उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपदाची हॅटट्रिक करत सावंतवाडी तालुक्याला जनरल चॅम्पियनशिप मिळवून दिलेली आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री.राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार श्री.दीपक केसरकर, माजी जि. प. अध्यक्ष श्रीम.रेश्मा सावंत,उपसभापती श्री. शितल राऊळ,जि. प. सदस्य श्रीम. स्वेता कोरगावकर,श्रीम. उन्नती धुरी ,माजी सभापती श्री. रविंद्र मडगावकर, श्रीम. मानसी धुरी, सदस्य श्री. राजन मुळीक, गटविकास अधिकारी श्री. रविंद्र कणसे, गटशिक्षणाधिकारी श्रीम. कल्पना बोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.

या यशाबद्दल केंद्र प्रमुख श्री. म.ल.देसाई ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सखाराम कुंभार,सरपंच श्रीम. वर्षा वरक, मुख्याध्यापिका , सहकारी शिक्षक,पालक व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!