कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

हरीश (संतोष) नार्वेकरची सायकलिंग मध्ये गरुडझेप

🛑हरीश (संतोष) नार्वेकरची सायकलिंग मध्ये गरुडझेप

🛑मळगांवच्या सुपूत्राचा स्पर्धात्मक सायकलिंग मध्ये विक्रम

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,५मार्च : चिकाटी, धैर्य आणि सातत्य याच्या जोरावर मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचा विद्यार्थी तथा मळगांव पंचक्रोशीतील व्यवसायीक संतोष उर्फ हरीश नार्वेकर याने सायकलिंग मध्ये उत्तुंग गरुड झेप घेतली आहे.मागील तीन चार वर्षांपासून सायकलिंग करणाऱ्या हरीश नार्वेकर याने स्पर्धात्मक सायकलिंग मध्ये एक विक्रम नोंदवला आहे. मळगांवमध्ये फार थोड्याच लोकांना याची कल्पना असून हरीश याने AUDAX CLUB PERSIAN या 100 वर्ष जुन्या रशियन क्लबच्या वतीने जगभर घेण्यात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या सायकलिंग इव्हेन्ट मध्ये हे यश संपादन केले आहे. हा सायकलिंग इव्हेन्ट
200 कि. मी. हे अंतर 13 तास 30 मिनिटे यावेळेत तर
300 कि. मी. चे अंतर 20 तास,
400 कि. मी. चे अंतर 27 तास,600 कि. मी. हे अंतर 40 तास
अशा पद्धतीने घेतल्या जातात. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या वर्षात हे चारही इव्हेन्ट यशस्वीरीत्या जो पूर्ण करतो त्याला SUPER RANDONNEUR (SR) ही लेव्हल मिळते. . 2021 मध्ये हे मेडल हरीश नार्वेकरने मिळवलेले आहे. आपल्या जिल्ह्यात त्याच्यासह फक्त 6 जणांनीच हा किताब मिळवलेला आहे. भारतभर आत्तापर्यंत 900 /1000 जण SR असून त्यापैकी हरीश हा एक आहे. हरीशने काही मार्ग सदर इव्हेन्टसाठी पुर्ण केले आहेत.
या मध्ये 200 कि. मी. हे सावंतवाडी – खारेपाटण – सावंतवाडी असे तर
300 कि. मी. हे सावंतवाडी – राजापूर – सावंतवाडी असे,
400 कि. मी. हे सावंतवाडी – सांगली – सावंतवाडी असे,
600 कि. मी. हे संकेश्वर – पुणे – संकेश्वर असे अंतर पार केले आहेत. हरीश केलेल्या या विक्रम सहीत त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मळगांव मधील ग्रामस्थ, मित्र परिवार व नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!