पंचवीस वर्षानंतर माडखोल धुरीवाडी शाळेत रम्य पहाट उगवली,_* *_🛑शाळेचा रौप्य महोत्सव धुमधडाक्यात साजरा_
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि3मार्च,:-*
माडखोल धुरीवाडी शाळेचा रौप्यमहोत्सव २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दिपकभाई केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच प . पु. अवधुतानंद महाराज यांचे सुपुत्र वेदांग तावडे, माडखोल गावचे सरपंच मा संजय शिरसाट, उपसरपंच शिवाजी परब, पंचायत समिती सदस्य मा सुनंदा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य, मा सिद्धेश शिरसाट, राजेश देसाई, लक्ष्मण कोलमेकर, मा, प्रगती तावडे, उपस्थित होते, यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मा प्रदीप परब होते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष न्हानू धुरी यांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सव सोहळा सुरू झाला
रौप्य वर्षानिमित्त केक कापुन, तसेच 25 पुस्तके वाटून रौप्य महोत्सव साजरा करीत असताना शाळेसाठी जमीन देणारे कै गोविंद कृष्णा राणे यांच्यावतीनेत्यांचे सुपुत्र उल्हास राणे, उमेश राणे, उदय राणे यांचा सत्कार दिपकभाई यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच ही शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे कै तुळशीदास शिरसाट यांचा सत्कार त्यांचे सुपुत्र सरपंच संजय शिरसाट यांनी स्वीकारला.वेदांत तावडे, दिपकभाई केसरकर, तसेच मोहन परब, सरस्वती धुरी, जिजी धुरी, गणेश तेली, समिती सदस्य मा सुनंदा राऊळ, बँक संचालक रवींद्र मडगावकर,covid योद्धा म्हणून पानोलकर मॅडम,माजी सैनिक चंद्रकांत शिरसाट, परब, अध्यापन करून गेलेले शिक्षक, राणेगुरुजी, पंडित सर, अपर्णा सावंत, प्रकाश गावडे, बाबाजी झेंडे, बाबनी ठाकूर,प्रशांत कांदे, दत्ताराम सावंत यांचा सत्कार करण्यात आला,
सावंतवाडी “टॅलेंट सर्च “मध्ये टॉप टेन मध्ये आलेली शाळेची विद्यार्थिनी समृद्धी धुरी हीचा सत्कार करण्यात आला, तसेच प्राची परब हिने दहावी मध्ये 90 % गुण घेतल्याने तिचा सत्कार करण्यात आला. तसेच भाव अंतरीचे हळवे लंगार गीत गाणारे मयूर गवळी यांचाही सत्कार करण्यात आला
.87 टक्के गुण घेऊन आय. टी. आय. पास होणारा साहिल तेली याचा सत्कार करण्यात आला.इंग्लिश मध्ये भाषण करणारी समृद्धी धुरी खास आकर्षण ठरली पंचायत समिती सदस्य सुनंदा राऊळ, सूर्यकांत राऊळ यांनी तिचे , व शाळेचे कौतुक केले. धुरी वाडीतील गायक सचिन धुरी याला आपल्या सरकारची शाल माडखोलचे माजी सरपंच सूर्यकांत दादा, सुनंदा राऊळ यांनी घालून त्याला प्रोत्साहन दिले.प्रथमेश धुरी, गजानन धुरी यांचाही सत्कार करण्यात आला.उत्कृष्ट काम करणारे प्रशांत कांदे सर, सावंत सर यांचा सत्कार स्मृतीचिन्ह देऊन महेश धुरी, न्हानू धुरी, दादा धुरी यांनी केला,
25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाळेला एक ट्रॉफी देण्यात आली. 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शाळेची रौप्य कलश ही हस्त लिखित पुस्तिकेचे प्रकाशन वेदांत तावडे यांच्याहस्ते करण्यात आले. स्वयंपाकी तेजस्वी लाड यांचंही सत्कार करण्यात आला.आमदार साहेब यांनी शाळेसाठी कॉम्पुटर, पाण्याची सुविधा, देण्याची ग्वाही दिली तसेच, 10000 रुपये रोख दिले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कांदे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक दत्ताराम सावंत यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी शुभेच्या दिल्या. सकाळी सत्यनारायण महापूजा घालण्यात आली. रात्री चेंदवनकर गोरे दशावतार मंडळाचा ललाट रेषा हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*