चौकुळ येथे लोकसहभागातून स्वच्छता मोहीम_* *_🛑कॉर्बेट फाऊंडेशन चा पुढाकार_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि२७फेब्रुवारी,:-*
ग्रामीण पर्यटनासाठी प्रसिद्ध व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या चौकुळ गावात वाढत्या पर्यटनाबरोबरच कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे . जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या या गावांमध्ये प्लास्टिकचे साम्राज्य हळूहळू वाढत चालले होते याची जाणीव करून देण्याबरोबरच नैसर्गिक जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी या कचऱ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे होते.
दिनांक २६. २. २०२२ रोजी द कॉर्बेट फाउंडेशन व भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम तर्फे चौकुळ, केगद व नेने गावात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सकाळी ९:३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत पार पडलेल्या या मोहिमेमध्ये रस्त्यांवर पडलेले कागद, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशवी, काचेच्या बॉटल गोळा करून सावंतवाडी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्राकडे जमा करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या उपजीविका, नैसर्गिक संसाधन व शिक्षण या विभागातील योगेश मगदुम, रेश्मा बेडेकर, अमित गावडे, गणेश राठोड, अक्षय दळवी, चैतेश देसाई व दिशा शेटकर यांच्या सोबत तीनही ठिकाणच्या महिला बचतगट वर्ग, आशासेविका, अंगणवाडी सेविका व गावातील इतर महिलावर्ग मिळुन जवळपास ७० हुन अधिक महिला सदस्य या म़ोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या स्वच्छता मोहीमेदरम्यान रेश्मा बेडेकर व योगेश मगदूम यांनी उपस्थित महिला वर्गाला गाव व आसपासच्या परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. खासकरून प्लास्टिकचा अमर्याद वापर व त्याचे अयोग्य व्यवस्थापन हे आपल्याला किती घातक ठरू शकते याची जाणीव करून दिली. तसेच यापुढे गावात गोळा होणारा कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.
कचरा व्यवस्थापना साठी गावात जनजागृती केल्या मुळे गावातील महिलांकडून कॉर्बेट फाऊंडेशनचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

