कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 छत्रपती शिव शंभू मित्र परिवार तळवडे यांच्या वतीने विविध स्पर्धा व शिवज्योत

🛑 विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-०४ :- तालुका सावंतवाडी मधील श्री छत्रपती शिव शंभू मित्र परिवार तळवडे यांच्या वतीने सायकल मॅरेथॉन गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन पाककला स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगभरण हस्ताक्षर स्पर्धा व शिवज्योत आगमन आधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

शिवजन्म उत्सवाच्या औचित्य साधून श्री छत्रपती शिव शंभू मित्र परिवार तळवडे यांच्या वतीने तसेच श्री छत्रपती शिव शंभू मित्र परिवाराच्या वतीने मागील काही वर्षांप्रमाणेच यावर्षीही शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षीही होणार असून अशाप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार-विचार मुलांपर्यंत पोहोचावेत यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये सायकल मॅराथॉन, गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन , पाककला स्पर्धा, रंग भरण व हस्ताक्षर स्पर्धा आदी स्पर्धा तसेच शिवज्योत प्रज्वलन होणार आहे. सायकल मॅरेथॉनचे उद्घाटन 13 फेब्रुवारी 20 22 रोजी सकाळी ठीक 7.00 वाजता होणार असून तळवडे मारुती मंदिर या ठिकाणाहून याची सुरुवात होणार आहे.ही मॅरेथॉन दहा किलोमीटर व पंचवीस किलोमीटर अशा दोन अंतरात होणार आहे. या मॅरेथॉन मध्ये सहभागींसाठी फक्त 100 रुपये शुल्क असणार आहे.प्रत्येक सहभागी स्पर्धकास शिव पताका ,मेडल, सन्मान पत्र बहाल करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकांना नाष्टा व इतर गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यापैकी गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन

गड किल्ले स्पर्धा चालू झाली असून 12 फेब्रुवारी पर्यंत आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता 13 फेब्रुवारी रोजी गड-किल्ले प्रदर्शन सुरू होत असून 19 फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार आहे.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1500 रुपये, द्वितीय पारितोषिक 1000 रुपये व तृतीय 500 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मान केला जाणार आहे.

यावेळी पाककला स्पर्धेचे देखील आयोजन केले असून ही स्पर्धा दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 3.00 वाजता श्री मारुती मंदिर तळवडे या ठिकाणी घेतली जाणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकांचा गुणगौरव व प्रथम पारितोषिक नॉनस्टिक गिफ्ट सेट द्वितीय पारितोषिक इलेक्ट्रिक किटली व तृतीय पारितोषिक स्टेनलेस स्टील लेमन सेट दिला जाणार आहे.

तसेच रंग भरण व हस्ताक्षर स्पर्धा याप्रमाणेच शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी रंग भरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा तळवडे यांच्यासाठी ही स्पर्धा मर्यादित ठेवण्यात आली असून व वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू या मुलांना दिल्या जाणार आहेत. तर शिवज्योत प्रज्वलन दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता किल्ले यशवंतगड याठिकाणी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार होणार असून ही शिवज्योत यशवंत गडावरून धावत शिवजयंती उत्सवाच्या ठिकाणी आणली जाणार आहे.त्यासाठी सर्व शिवभक्त सकाळी . श्री मारुती मंदिर तळवडे या ठिकाणाहून जाण्यासाठी निघणार आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री मारुती मंदिर या ठिकाणी दिपप्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्ती पूजन होणार आहे.त्यानंतर सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण याठिकाणी केले जाणार आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिव शंभू मित्र परिवार तळवडे तर्फे देण्यात आली आहे.

________________________

 

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*

खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

 

*👉🏻नको तारण*

*👉🏻नको जामीन*

*👉🏻नको CBIL*

 

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

 

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

 

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी

🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

 

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*

👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा

 

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

——————————————

*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!