ठाणेमहाराष्ट्रराजकीय

🛑 प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी मनसेची “ठाणे विकास आघाडी”

🛑 छोटे पक्ष, इच्छुक, समाजसेवी प्रभुतींना एकत्र येण्याचे आवाहन..

🛑 ठाण्यात विकास आघाडी करून आव्हान उभे करण्याचा मनसेचा इरादा ; मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ठाणे, दि-०२ :- ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजु लागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे ठाणेकरांना गृहीत धरून सत्ताकारण करणाऱ्या प्रस्थापित राजकिय पक्षांना धडा शिकवण्याचा चंग मनसेने बांधला असुन छोटे-मोठे पक्ष, इच्छुक तसेच समाजातील समाजसेवी प्रभुतीना सोबत घेऊन ‘ठाणे विकास आघाड़ी’ रिंगणात उतरवणार असल्याचे सुतोवाच मनसे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे. तसेच सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. याच निवडणुकीत सत्ताधाऱ्यासह प्रस्तापित असलेल्या राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मनसे तयार असून ठाणे महापालिका निवडणुकीत ठाण्यात ‘ठाणे विकास आघाडी ‘ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे ज्याना तिकट मिळणार नाही, जे इच्छुक उमेदवार आहेत अश्या सर्वांना एकत्र घेऊन ठाणे विकास आघाडी स्थापन करण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीने ठाण्यात विकास आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. समाजात काम करत असणाऱ्या महत्वाच्या घटक, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत ठाणे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचे मैदान गाजवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन मनसेचे ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!