कोकणसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग बॅकेचे नवनिर्वाचित सदस्य सुशांत नाईक व विद्याधर परब यांचा तळवडे येथे सन्मान

सावंतवाडी ( सुखदेव राऊळ )
तळवडे अर्बन बँकेकडून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर सुशांत नाईक व विद्याधर परब हे दोघे जण निवडून आले. नवनिर्वाचित संचालक पदावर निवडून येण्याच्या या यशाबद्दल प्रकाश परब मित्रमंडळ व शिवसेना शाखा तळवडे यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नारायण परब, आपा परब, श्री गोडकर, जालिंदर परब, शिवसेना शाखाप्रमुख अनिल जाधव, बंटी परब, विनोद वराडकर, योगेश सावंत, दिनेश परब, महेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल तळवडे गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या वतीने कौतुक होत असून या दोघांकडून चांगल्या व योग्य कामाची अपेक्षा व्यक्त होत आहे. या दोघांनी ही तळवडे गावाच्या विकासासाठी आपणाकडून नक्कीच भरीव कामगिरी होईल असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!