कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

उपोषणात उपस्थित भ्रष्टाचाराची नक्कीच शासकीय पातळीवर चौकशी केली जाईल- आम. दिपकभाई केसरकर

*🛑उपोषणात उपस्थित भ्रष्टाचाराची नक्कीच शासकीय पातळीवर चौकशी केली जाईल- आम. दिपकभाई केसरकर*

*🛑उपोषण कर्त्याकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात संताप प्रदर्शित*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी,दि,:-२७ जानेवारी*
तुम्ही उपोषण कर्त्यानी पुकारलेले उपोषण हे ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आहे त्या भ्रष्टाचाराची नक्कीच शासकीय पातळीवर चौकशी केली जाईल. पण त्यापुर्वी तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकमेकाला विश्वासात घ्या. गावाचा विकास होणे महत्वाचे आहे. गाव एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करा. गावाच्या विकासासाठी एकमेकांना सहकार्य करा. जेव्हा वादाची स्थिती निर्माण होते तेव्हा शांतता राखणे महत्वाचे असते. शब्दाने शब्द वाढत असतो.चुकीचे शब्द वाढवत न राहता विकासाच्या दिशेने वाटचाल करणे महत्वाचे असते. हे उपोषण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्याची चौकशी निःपक्षपाती पणे केली जाईल”, असे आश्वासन देऊन आमदार दिपकभाई केसरकर यांनी दिले. ते बुधवारी मळगांव येथे ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याना व उपोषणाला विरोध असलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना उद्देशून बोलत होते. विद्यमान मळगांव ग्रामपंचायतीमध्ये “लहान मुलांची खेळणी विकत घेण्याच्या नावाने भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपा अंतर्गत मळगांव ग्रामस्थांनी “भ्रष्टाचाराच्या विरोधात “जावई हटाव समिती” या बॅनरखाली मळगांव ग्रामपंचायती समोर पुकारलेले उपोषण मा.केसरकर यांनी उपोषणकर्त्याना निंबूपाणी पाजून उपोषण थांबविले व त्यांनी सर्व ग्रामस्थांशी संवाद साधला.
मळगांवचे ग्रामस्थ आना गावकर यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी पुकारण्यात आलेल्या या उपोषणात मळगांव ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, मनोहर राऊळ, गुरुनाथ गावकर सदस्य स्वरूपा राऊळ तसेच ग्रामस्थ महेश शिरोडकर, सखाराम गावकर, मदन राऊळ, सोनल सावळ, विजय हरमलकर,दत्तात्रय राऊळ, हरिश्चंद्र राऊळ , भालचंद्र सावंत आदी 23 उपोषणकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उपोषणकर्त्याची समजूत काढताना केसरकर यांनी, “गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमदार या नात्याने आपणाकडून मळगांवच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. गावाच्या ग्रामसभेला खुप महत्त्व असते. गावाच्या विकासासाठी आवश्यक योजना ग्रामसभेत कार्यान्वित करायच्या असतात. काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील. त्याची निश्चितच उच्चस्तरीय पातळीवर चौकशी करुन सत्य समोर आणले जाईल. तोपर्यंत गावातील वातावरण शांत व सुरळीत ठेवा”, असा सल्लाही त्यांनी दिला.
या उपोषणात सहभागी झालेले उपोषणकर्ते ग्रामस्थ गुरुनाथ गावकर यांनी, “गावाची दुर्दशा होत आहे. ग्रामपंचायतीच्या 13 ही सदस्यांनी याचा विचार करावा. गावात जो, फलक लागला तो ग्रामसभेच्या निर्णयानुसार लागला. भ्रष्टाचार ज्या खेळण्यांसाठी झाला ती खेळणी एकाही अंगणवाडीत नाहीत. या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याजवळ आहेत. हे उपोषण पक्ष किंवा एकट्या सरपंच विरोधात नसून भ्रष्टाचार विरोधी आहे. धनादेश काढून झाले. आता खेळणी कधी येणार? 1 लाख 48 हजार रुपयांचा प्रश्न आहे. खेळणी विकत घ्यायला एवढी रक्कम लागली का? तब्बल 13 धनादेश काढण्यात आले. गेले 9-10 महिने गाव गप्प आहे. गावातील अंगणवाडीत मुले किती आणि खर्च किती? असे प्रश्न ही गावकर यांनी उपस्थित केले.
तर सखाराम गावकर यांनी हे उपोषण ग्रामस्थांचे आहे. आपण या उपोषणापूर्वी सरपंच यांना भेटण्यासाठी गेलो मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जर प्रतिसाद दिला असता तर उपोषण मागे घेतले असते.गावात भ्रष्टाचार रुपी पिशाच्च शिरले आहे. ग्रामदेवतां कडे गाऱ्हाणे करुया की या पिशाच्चाला शासन कर. गावाचा विकास होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन मा. केसरकर यांच्याकडे ” या भ्रष्टाचार प्रकाराची चौकशी लावा. तसेच ग्रामविकास अधिकारी बदलणे आवश्यक आहे, अशी मागणी केली.
सदस्य आनंद देवळी यांनी खेळणी खरेदी बाबत मासिक सभेत विषय नसताना टेंडर व धनादेश का काढण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला.
तर उपोषण प्रमुख आना गावकर यांनी, ” बिल एक होते. मात्र धनादेश वेगळ्या नावाने का? प्रोसिडींग मध्ये बदल का केला? “असा प्रश्न उपस्थित केला. या उषोषणावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️जागा भाड्याने देणे आहे*

*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*

👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला

🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️

*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!