आम. दिपकभाई केसरकर यांची मळगांव ग्रामपंचायतीला भेट*
*🛑आम. दिपकभाई केसरकर यांची मळगांव ग्रामपंचायतीला भेट*
*🛑गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी,दि,:-२७ जानेवारी*
मळगांव गावच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर आहे. गावातील समस्या सोडविण्याबाबत आपण कटीबद्ध आहे.गावातील रस्ते व पुल यांच्या दुरुस्ती साठी निधी उपलब्ध करुन देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करेन, असे आश्वासन बुधवारी आमदार दिपकभाई केसरकर यांनी दिले. मळगांव मधील ग्रामस्थांनी पुकारलेले उपोषण संपवल्यानंतर आमदार केसरकर यांनी मळगांव ग्रामपंचायतीमध्ये भेट दिली.
यावेळी उप सरपंच हनुमंत पेडणेकर , सावंतवाडी पंचायत समिती चे माजी सभापती राजू परब, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश कुडव, तसेच गजानन सातार्डेकर, चंद्रकांत जाधव,निलेश राऊळ,निलेश चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ राऊळ,सदस्या अनुजा राणे, सुभद्रा खडपकर,निकिता राऊळ, निकिता बुगडे,निळकंठ बुगडे व अर्जुन राऊळ तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील समस्या व प्रश्न याबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर आम. केसरकर यांनी गावातील सामाजिक व अन्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राजू परब यांनी ग्रामपंचायत सभागृहात भेट दिल्याबद्दल केसरकर यांचे आभार मानले. तसेच परब यांनी , ” काम करत असताना चुका होत असतात. त्यातून मार्ग काढायचा असतो. गाव एक संघ ठेवण्यासाठी प्रयत्न करु, कारण राजकीय पक्ष वेगळे व गाव वेगळा आहे. गावाच्या विकासासाठी सर्वानी सहकार्य करावे” असे आवाहन केले.ग्रामपंचायत उप सरपंच व सदस्य तसेच व ग्रामस्थ यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी आपण निश्चितच प्रयत्न करु असे आश्वासन देताना आम. केसरकर यांनी राजू परब यांनी मांडलेल्या “गावातील रस्ते व पुल यांच्या दुरुस्तीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित विद्या परब सिंधुदुर्ग बॅंक संचालक, पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांचा सत्कार उपसरपंच हनुमंत पेडणेकर व राजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️जागा भाड्याने देणे आहे*
*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*
👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला
🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️
*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

