कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

ध्वजवंदनातील ‘तो’ प्रकार दुर्दैवी!

*🛑ध्वजवंदनातील ‘तो’ प्रकार दुर्दैवी!*

*🛑बबन साळगावकर यांची नाराजी दोषींवर कारवाईची मागणी*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी,दि,:-२७ जानेवारी*
जासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. ध्वजस्तंभाला लावलेली ‘पाचर’ निषेधार्ह असून प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा अक्षम्य आहे. राष्ट्रध्वजाचा हा अवमान असून प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

येथील पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताकदिनी सकाळी प्रांताधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करताना स्तंभावरची रस्सी घसरली. हा स्तंभ, चक्र जुने झाला आहे. यात चार-पाच मिनिटे रस्सीची ओढाताण चालली होती. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, प्रशासनातील अनेक अधिकारी, विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना साळगावकर म्हणाले की,
हा प्रकार म्हणजे प्रशासनाची अनास्था आहे. कालच या स्तंभाची रंगरंगोटी केल्याचे निर्दशनास आले. परंतु तांत्रिकबाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेला आहे.
राष्ट्रध्वज हा भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. त्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी रक्त सांडले आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणून आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. त्यामुळे प्रशासनाचा झालेला हा दुर्लक्ष निषेधार्ह आहे. हा प्रकार गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर प्रांत, तहसीलदार अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. ही गोष्ट राष्ट्रध्वजाचे अवमान करणारी आहे. त्यामुळे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️जागा भाड्याने देणे आहे*

*🛣️मुंबई-गोवा महामार्गालगत*

👉🏻कसाल एस टी स्टँड 🚍बाजूला

🏥क्लिनिकसाठी 900 स्केअर फुट जागा भाडेने देणे आहे. 🗺️

*सुनंदा अपार्टमेंट आनंदसाई मेडिकल शेजारी रावळ कॉम्प्लेस,कसाल*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📱आमचा संपर्क-9422393027*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!