आणखीकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

तहसीलदार कार्यालयात महसुल शाखेच्या कामासाठी आलेल्या नागरिकांची दुपारच्या सत्रात तोबा गर्दी…

🛑…तेथील काम करत असलेल्या महिला कर्मचारी यांच्या तोंडावरील मास्क देखील खाली

🛑तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग आणि अधिकाऱ्यांची कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या कणकवली प्रतिनिधी यांना दिली उडवाउडवीची उत्तरं…!!!

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️सडेतोड प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. १४ जानेवारी – तहसीलदार कार्यालयात महसुल शाखेच्या कामासाठी आलेल्या नागरिकांची दुपारच्या सत्रात गर्दी दिसुन आली. या गर्दीत लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते, तसेच तेथील काम करत असलेल्या महिला कर्मचारी यांच्या तोंडावरील मास्क देखील खाली करून ठेवलेले दिसुन आलेत.

तहसीलदार यांच्या कक्षात देखील नागरिकांनी टेबलाभोवती झुंबड करून ठेवली होती. हे तेथील काम करत असलेल्या कर्मचारी व एका महिला पोलिस अधिकारी यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या कणकवली प्रतिनिधी यांनी सांगितलं असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत. हे आमचं काम नाही? तुम्ही बाहेर जा? अस बोलत तहसीलदार यांच्या कक्षाचा दरवाजा जोरात आपटत बंद करून घेतला.

जर सरकारी कामगार आणि कर्मचारी पत्रकार यांच्या सोबत अस वागत असतील, तर सर्व सामान्य माणसाला हे कशी वागणुक देत असतील. हे आजच्या प्रसंगावरून दिसुन आले.

अशा या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई केली होणे गरजेचे आहे. हेच जर नियम पाळत नसतील, तर बाकीच्या नागरिकांकडुन काय अपेक्षा करणार?

‌‌आधी या कर्मचारी आणि अधिकारी यांना दंड लावा, मगच सर्व सामान्य जनतेला दंडाची कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!