कारिवडे येथील क्रिकेट स्पर्धेत तुळस संघ विजयी
🛑कारिवडे येथील क्रिकेट स्पर्धेत तुळस संघ विजयी
🛑नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले बक्षीस वितरण
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि,११: येथील श्री देव हेळेकर युवक मंडळ कारिवडे पेडवेवाडी आयोजित एक गाव एक संघ या क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दिनांक ८ जानेवारी रोजी या स्पर्धेची सुरुवात झाली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मा.पंचायत समिती सदस्या सौ केळुसकर मॅडम भाजपा तालुका उपाध्यक्ष अशोक माळकर,आनंद तळवणेकर मुख्याध्यापिका पोकळे मॅडम, भरडे सर, यांच्या हस्ते करण्यात आले.
या तीन दिवसांच्या स्पर्धेत एकूण सोळा (१६ ) संघांनी सहभाग घेतला होता.यामध्ये तुळस संघ विजेता तर निरवडे संघ उपविजेता ठरला.
यावेळी श्री देव हेळेकर मंडळाचे अध्यक्ष महादेव माळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांची जिल्हा बँक संचालक पदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश सारंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करून या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि समालोचक राजा सामंत यांना गौरवण्यात आले.
यावेळी अध्यक्ष महादेव माळकर, मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

