कोलगाव ग्रामपंचायत,सोसायटी आणि दुग्ध संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक महेश सारंग,गजानन गावडे यांचा करण्यात आला भव्य सत्कार
🛑कोलगाव ग्रामपंचायत,सोसायटी आणि दुग्ध संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक महेश सारंग,गजानन गावडे यांचा करण्यात आला भव्य सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि४:- जिल्हा बँक निवडणुकीत मच्छीमार, दुग्ध संस्था मतदारसंघातून
महेश सारंग यांनी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या विजयाने
कोलगाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या
विजयानंतर मंगळवारी कोलगाव ग्रामपंचायत, कोलगाव सोसायटी
आणि कोलगाव दूध संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा बँक
संचालक महेश सारंग, गजानन गावडे यांचा भव्य सत्कार करण्यात
कोलगाव गावाच्या महिला संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह रामचंद्र पालव, निनाद पटवर्धन, सुरेश पुराणिक, विनीत घाडी आदीसह उपस्थितांकडून महेश सारंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना कोलगाव दुग्ध उत्पादक संस्थेचे व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर सावंत म्हणाले, हा दुग्धशर्करा योग असून गावासाठी मानाचा क्षण आहे. आमच्या गावचा सुपुत्र जिल्हा बँकेवर निवडून आलाय याचा अभिमान आहे अस मत त्यांनी व्यक्त केल.
तर आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. गेली दोन वर्षे घेतलेल्या मेहनतीच हे फळ आहे. नवा युवा चेहरा असताना देखील महेश सारंग यांनी दणदणीत विजय संपादीत केलाय. जिल्ह्याला सहकारातून समृद्धीकडे नेण्यात महेश नक्कीच यशस्वी ठरतील असा विश्वास कोलगाव सरपंच राऊळ यांनी व्यक्त केला.
त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर हा विजय मिळवता आला. विरोधकांनी नवखा असल्याची टिका केली. मात्र उत्तर देण आम्ही टाळलं, त्यांना उत्तर हे निकालातूनचं मिळाल आहे. दुग्ध, मत्स, पशु या मतदारसंघात विकासात्मक काम करून आगामी काळात देखील सहकार क्षेत्रात मोठ योगदान देईन. तर कोलगावसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकाराच्या माध्यमातून विकासाची गंगा आणाणर असल्याचा विश्वास व्यक्त करत महेश सारंग यांनी सत्कारासाठी, ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रेमासाठी ऋण व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांमध्ये असणारा उत्साह पाहता वेगळी उर्जा मिळते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून भाजपच्या पॅनलला लोकांनी स्वीकारल असून भविष्यात सहकारात क्रांती घडेल. तर सहकारात नवे असले तरी महेश सारंग यांचा प्रशासनाचा असलेला दांडगा अनुभव पाहता नक्कीच ते चांगलं काम करतील. तर महेश सारंग यांच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून कायम उभा राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, एकमेका साहाय्य करू अ सुपंथ या उक्ती प्रमाणे कार्य करण्याचा मनोदय नवनिर्वाि संचालक गजानन गावडे यांनी व्यक्त केला.
तर महेश सारंग आणि मी जवळ जवळ २५ वर्ष एकत्रीत काम करत आहोत. त्यांची काम करण्याची पद्धत पाहता सरपंच ते उपसभापती या काळात त्यांनी केलेल काम उल्लेखनीय आहे. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवायच्या हे त्यांच्याकडून शिकावं. २०१२ ला त्यांनी दुग्ध उत्पादक संस्था त्यांनी स्थापन केली. त्यांच्यामुळे कोलगाव गावाचा जिल्ह्यासह राज्यात गौरव झाला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे ते आपल्या पदाला नक्कीच न्याय देतील अस मत कोलगाव सोसायटीचे चेअरमन चंदन धुरी यांनी व्यक्त केल.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, कोलगाव सोसायटीचे चेअरमन चंदन धुरी, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, एल. एम. सावंत, दुग्ध संस्थेचे व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर सावंत, माजी सरपंच बळवंत उर्फ राजन कुडतरकर, उपसरपंच दिनेश सारंग, संदीप हळदणकर, सुरेश टीळवे, सलाम शेख, विनिता घाडी, बाळा राऊळ, सुरेश पुराणीक, अनिल नाईक, स्नेहा टिळवे, संयोगिता उगवेकर, आशिका सावंत, रसिका करमळकर, रोहित नाईक, आत्माराम चव्हाण, रामा म्हैसकर, विजय टीळवे सुधाकर राणे राज चेंदवणकर सुरेश दळवी आदि उपस्थित होते.
________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*
*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

