सावंतवाडी — तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार आज जाहीर
*🛑सावंतवाडी — तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार आज जाहीर*
*🛑अमोल टेंबकर, हेमंत मराठे, हरिश्चंद्र पवार,उत्तम नाईक, हर्षवर्धन धारणकर,बाळा खडपकर,पुरस्काराचे मानकरी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :२ जानेवारी*
वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार अमोल टेंबकर, कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार हेमंत मराठे, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार हरिश्चंद्र पवार, स्व. त्रि. अ ऊर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार उत्तम नाईक, जीवनगौरव पुरस्कार डॉ. स्वार पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन धारणकर, छायाचित्रकार तथा ज्येष्ठ पत्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार उत्कृष्ट छायाचित्रकार बाळा खडपकर यांना जाहीर करण्यात आला.
पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष प्रविण मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकारिता पदवीधर समन्वयक राजेश मोंडकर, समिती सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी पुरस्कार जाहीर केले.
६ जानेवारीला सकाळी ११ वाजता माजगाव येथील डायमंड हॉल येथे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुक्ष्मी, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, राष्ट्रीय पत्रकार परिषद अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार समिती जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, ज्येष्ठ पत्रकार वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
तालुका पत्रकार समितीची सभा आज पत्रकार कक्षात समिती अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते. या बैठकीत पत्रकार समितीच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी खजिनदार रामचंद्र कुडाळकर मो. नं. ९७६३७१७७६१ यांच्याकडे नावे नोंद करावे असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रविण मांजरेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻👇👇👇👇👇👇👇👇👇
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

