कोकणशासकीयसामाजिक

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

 

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात तहसीलदारांच्या द्वारे पाठवले निवेदन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरो न्युज:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी:- छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी सागरी मार्गाने होणारे आक्रमण मोडून काढण्यासाठी स्वतःचे आरमार आणि जलदुर्गांचीही निर्मिती केली. या आरमाराच्या माध्यमातून इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आदी परकीय आक्रमकांचा बिमोड करत स्वराज्याचे रक्षण केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ असे म्हटले जाते. जलदुर्ग हे शिवरायांच्या दुर्ग बांधणीच्या तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व अविष्कारच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या किल्ल्याचे संवधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खात्यांना त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक संदेश गावडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना देण्याचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, देवगड, सावंतवाडी, कणकवली येथे तहसीलदार यांना, तर ओरोस येथे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यानिमित्ताने ट्विटरवर #Save_ Vijaydurg_Fort हा ट्रेंड चालविण्यात आला. हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर २६ व्या क्रमांकावर राहीला. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभागी होत विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाची मागणी करण्यात आली.

*या निवेदनात म्हटले आहे की* …
१. विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवर गवत आणि झाडे वाढली आहेत. किल्ल्यावर ‘जिबीचा दरवाजा’, अशी पाटी आहे; मात्र तेथे दरवाजाच नाही. तसेच महाद्वारालाही दरवाजे नाहीत. अनेक ठिकाणी तटबंदी कोसळी आहे. देवडी आणि नगारखाना यांची दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर भगवा ध्वज लावलेला नाही. टेहाळणी बुरुजामध्ये असलेले शिवमंदिराही खराब झाले आहे. किल्ल्यावर श्री भवानी देवी मंदिराविना आहे. तलावाची दुर्दशा झाली आहे. अशा अनेक प्रकारे किल्ल्याची दुरवस्था झाली आहे.

२. वरील सर्व गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकतात, तर मग पुरातत्व विभागाला का लक्षात येत नाहीत ? याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अमूल्य अशा ऐतिहासिक ठेव्याला आपण कायमचे मुकू शकतो.

३. भावी पिढीमध्ये राष्ट्राप्रती निष्ठा अन् जाज्वल्य अभिमान निर्माण करण्यासाठी अशा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे किल्ल्याच्या या दुरवस्थेला उत्तरदायी असलेल्या संबंधित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाईही करावी.

४. आमच्या मागण्यांची योग्य ती नोंद घेऊन तत्परतेने कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे त्वरित संवर्धन करण्याचा निर्णय न दिल्यास याविषयी वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे जिल्हा समन्वयक संदेश गावडे यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना सांगितले.

________________________
,*आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना निरोगी आयुष्यमय शुभेच्छा*

*नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !*

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!