वेंगुर्लेत पकडला तब्बल १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा “गुटखा”
वेंगुर्ले पोलिसांच्या “ऑपरेशन ऑल आऊट” मध्ये तपासणी दरम्यान उभादांडा मानसिश्वर रोडवर गाड्या तपासताना एका चारचाकी गाडीमध्ये तब्बल १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा “गुटखा” आढळून आला आहे. पोलिसांनी सदर ४ लाखाची गाडी मुद्देमालासह ताब्यात घेतली. तसेच बांदा देऊळवाडी येथे रहाणारा गाडी चालक अभय नारायण केसरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
वेंगुर्ले शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी आणण्यात येतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. केसरकर हे ऑपरेशन ऑल आउट मुळे वेंगुर्ले शिरोडा मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करत होते. या ऑपरेशन मध्ये त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल डी. सी. पालकर, महिला पोलिस पूजा पालेकर, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर सहभागी होते. तपासणी करताना सायंकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास उभादांडा येथून वेंगुर्ले च्या दिशेने येणारी जी ए. ०३ झेड ४६१७ या क्रमांकाची व्हॅगनार गाडी दिसली. पोलिसांनी त्या गाडीला तपासणीसाठी थांबवले. यावेळी तपासणी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा गुटका बॉक्स मध्ये आढळून आला. पोलिसांनी गाडी चालवणारा अभय केसरकर याला त्याच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक केसरकर करीत