कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

भाजपची ओबीसी आरक्षण भूमिका दुटप्पी ; बाळ कनयाळकर

_*🛑 भाजपची ओबीसी आरक्षण भूमिका दुटप्पी ; बाळ कनयाळकर*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴कुडाळ,दि-१३-:* ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच घेऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचा अट्टाहास संभ्रमित करणारा आहे. यावरून ओबीसी आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचाच विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. राणे यांनी नगरपंचायत निवडणुकांबाबत दुटप्पी भूमिका घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षण प्रश्नाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूका स्थगित कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कनयाळकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे, मात्र भाजपाचे पदाधिकारी वाघ यांनी ओबीसी आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ओबीसी जागा रिक्त ठेवून अन्य जागावरील निवडणूका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या अनपेक्षित निकालामुळे ओबीसी समाजाबरोबरच सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला. त्यामुळे सर्व स्तरातून ओबीसी आरक्षणासाठी लढा उभा राहिला,जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोवर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूका स्थगित कराव्यात असे ठरविले. तसेच सर्वच राजकीय पक्षांची भुमिका हीच आहे. मग भाजपचेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूका ठरलेल्या वेळेतच घेतल्या पाहिजेत, महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत नसल्याने घोषित निवडणूका राज्य सरकारचा पुढे ढकलण्याचा डाव आहे, असे संभ्रमित विधान केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ओबीसी समाज आरक्षणाविरोधात आहे हे ओबीसी समाजाला समजलं आहे. त्यामुळे येत्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाला सहकार्य करणार नाही, असे नमुद करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निवडणुकी घेण्याबाबतचे ते विधान भारतीय जनता पक्षाचे की व्यक्तीगत नारायण राणे यांचे मत आहे ? याचा खुलासा नारायण राणे यांनी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणूका निवडणूक आयोगाने घोषित करू नये, असेही कनयाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

*…………..👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!