कुडाळमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

गावच्या विकासासाठी सरपंचाकडे व्हिजन हवे : निलेश राणे’ पणदूरच्या नूतन तलाठी कार्यालयाचे उदघाटन

*🟣गावच्या विकासासाठी सरपंचाकडे व्हिजन हवे : निलेश राणे’ पणदूरच्या नूतन तलाठी कार्यालयाचे उदघाटन*

*🟣जिल्ह्यातील सत्ताधारी विकासासाठी निधी आणू शकत नाहीत ही शोकांतिका : निलेश राणे*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी :-सुनिल आचरेकर*

*🎴कुडाऊ,दि,:-१९ नोव्हेंबर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्तेतील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी विकासासाठी निधी आणलेला दिसत नाही, आणि ते आणू शकत नाहीत, ही या जिल्ह्याची शोकांतिका असल्याचे माजी खासदार निलेश राणे म्हणाले. पणदूर येथील नूतन तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विकासाचे व्हिजन हे त्या गावच्या सरपंचाकडे असणे गरजेचे आहे, ते व्हिजन पणदूर सरपंच दादा साईल यांच्याजवळ आहे हे अभिमानास्पद आहे, त्यांचे कामच निधी खेचून आणील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पणदूर येथील नूतन तलाठी कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पणदूर सरपंच दादा साईल, उपसरपंच शिवराम पणदुरकर, भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, सभापती नूतन आईर, भाजपचे जिल्हा कार्यकारणीचे आनंद शिरवलकर, विशाल परब, युवा मोर्चाचे रूपेश कानडे, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, बांव सरपंच नागेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साक्षी सावंत, जिल्हा महिला सरचिटणीस रेखा काणेकर, बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल, चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देवू सावंत, माजी सरपंच शामसुंदर सावंत, महादेव सावंत, ग्रामसेविका सपना मसगे आदी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्तेतील पालकमंत्री, खासदार, आमदार आहेत पण त्यांचा उपयोग झालेला नाही. जिल्ह्याला हवा तसा निधी येत नाही. जिल्ह्यातील असा एकही गाव राहिलेला नाही ज्या गावांमध्ये एक किलोमीटर मागे रस्त्यावर खड्डा नाही. सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. आज राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची साधी चर्चा सुद्धा नाही. मात्र या सत्तेतील लोकप्रतिनिधीचा दिवस राणेंवर टीका केल्याशिवाय जात नाही. या टीका करण्यापेक्षा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी वेळ घालवा, असे ते म्हणाले. पणदूर सरपंच दादा साईल यांनी ज्या पद्धतीत आपल्या गावच्या विकासाचे व्हिजन पाहिले आहे आणि त्या दृष्टीने ते विकासासाठी प्रयत्न करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे व्हिजन प्रत्येक गावातील सरपंचाने पाहणे गरजेचे आहे. आपण आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचे उदाहरण देतो पण या ठिकाणी सुद्धा दादा साईल सारखे सरपंच आहेत, जे गावाच्या विकासासाठी झटत आहेत. आज जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या इमारतीची अवस्था खराब आहे, तिथे जावेसे सुद्धा वाटत नाही. पणपणदूर गावाच्या ग्रामपंचायतीची इतकी सुंदर इमारत असताना त्यातही आणखी चांगल्या सुविधांचे स्वप्न दादा साईल पाहत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या गावात तलाठी कार्यालय आणणे ही सोपी गोष्ट नाही, ती साईल यांनी करून दाखवली याबद्दल निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नुसत्या घरपट्टी आणि पाणीपट्टीवर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्या बरोबर पर्यटना सारख्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होऊ शकतो, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, असे राणे म्हणाले. त्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महामार्गाचा ठेकेदार कामे अर्धवट सोडून पळून गेला, त्याला पुन्हा घेऊन येऊन कामे पूर्ण करण्याची सत्तेतील कोणत्याही लोकप्रतिनिधीत धमक नाही, जिल्ह्याच्या विकासासाठी निधी फक्त भाजपच्याच माध्यमातून येऊ शकतो, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!