भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकुर यांनी ग्रामस्थांसहीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि१८नोव्हेंबर,:-
दिनांक १४ रोजी झालेल्या अचानक वादळाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले .सुमारे १०० ते १५० घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले .तसेच चक्रिवादळामुळे उत्पंन्न देणारी झाडे जमीनदोस्त झाली . वेंगुर्ले – बेळगाव रस्त्यावर झाडे व विजेचे खांब पडल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली .त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून बोवलेकर वाडीतील नादुरुस्त पुलावरून वाहतूक सुरू केली. परंतु कित्येक वर्षे ग्रामस्थांची बोवलेकर वाडी येथील पुल करावा अशी मागणी असताना निधीची अनुपलब्धता असे कारण सांगुन ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावली . याच रागातुन ज्यावेळी पर्यायी मार्गाने वहातूक सुरु झाल्यावर ग्रामस्थांनी जवळ जवळ चार तास रास्ता रोको आंदोलन केले .
या आंदोलनाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भेट देऊन आपण या प्रश्नी जिल्हाधिकारी यांचेशी भेट येऊन मार्ग काढुया असे अभिवचन ग्रामस्थांना दिल्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले .
आज १८ नव्हेबर रोजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकुर व ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली तसेच तातडीने बोवलेकर वाडी येथील पुल तसेच जोडरस्ता दुरुस्तीची मागणी केली . त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब वेंगुर्ले तहसीलदार यांचेशी संपर्क करुन नुकसानीचा अहवाल मागवला व जास्तीत जास्त वादळग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासीत केले .
त्यानंतर याच शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीतकुमार नायर यांची भेट घेऊन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त पहाणी दौरा करून पुलाची व रस्त्याची तातडीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली असता येत्या दोन दिवसातच संबंधित अधिकारी मठ गावात येऊन संबंधित पुलाची पहाणी करतील असे आश्वासन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मठ गावातील दुर्लक्षित प्रश्नांना चालना दिल्याबद्दल मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकुर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , युवा नेते अजित नाईक , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर , युवा मोर्चा चे समीर नाईक , मठ ग्रामसेवक केळुसकर उपस्थित होते .
________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_
*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*
*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*
_🏃♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃♂️_
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*
*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*
*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*
*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*
*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722
*नियम व अटी लागू*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*