राजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

प्रतिदीन ३ कोटींपेक्षा जादा, महीना १०० कोटींचा ‘गुटखा’ एकट्या सिंधुदुर्गात विकला जातोय..

▪️वरुन खाली पर्यत हप्तेखोरांची साखळी असल्याने ‘गुटखा बंदी’ करुन शासनाने हप्तेखोर अधिकाऱ्यांना हप्ते गोळा करणारा ‘साईड बिजनेस’ सुरु करुन दिला आहे का?

▪️’राष्ट्रपती’ पुरस्काराने हप्तेखोर अधिकाऱ्यांना शासनाने सन्मानीत करावे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴सिंधुदुर्ग,दि.१८: प्रतिदिन ३ कोटी पेक्षा जादा महीना १०० कोटी पेक्षा जास्त गुटखा एकट्या सिंधुदुर्गात हप्तेखोर अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचे हप्ते देऊन विकला जातोय. वरुन खाली पर्यत हप्तेखोर अधिकाऱ्यांची लोकप्रतिनिधींची साखळी असून अशा समाजाला आतून पोखरणारा हा घातक कँन्सरला निमंत्रण देणारा गुटखा शासनाने बंद करुन वरुन खाली पर्यतच्या हप्तेखोर लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना साईड बिजनेस म्हणून शासनाने सुरु करुन नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले आहे. व सामान्य माणसांचा, तरुणांचा कँन्सरने जीव घेणारा समाजाला आतून वाळवी सारखा पोखरणारा हा उद्योग सुरु करुन महीना ५० लाखांपासून ५० हजारांपर्यत हप्ते घेणाऱ्या अन्नभेसळ प्रतिबंध विभाग ते खाकीतील पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कारांने शासनाने सन्मानीत करुन जीनजीवन विस्कळीत करणाऱ्या तरुण, तरुण मुलींना विधवा निराधार बनवून त्यांच्या फुलपाखरांसारख्या लहान-लहान मुलांचे जीवनच उध्वंस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने महागाईवाढ करुन गरीब जनतेच्या कराच्या पैशातून सातवा आयोग लागू करुन ८० हजारांपासून दोन लाखांपर्यतचा वाढविलेला पगार कमी पडत असल्याने अशा हप्तेखोर अधिकाऱ्यांना शासनाने हप्ते गोळा करणारा नवा साईड बिजनेस सुरु करुन दिलेला आहे का? असा सवाल करणारे सिंधुदुर्गात निर्भिड पत्रकारच जन्माला आलेले नाहीत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हप्तेखोर अधिकाऱ्यांना आंदन देण्याचे काम जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक महीला भ्रष्टाचार विरोधी संघटनांनी दिला आहे का?

साध्या क्षुल्लक प्रकरणात राजकारण करुन ऐकमेकांच्या उरावर बसणारे राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी वृत्तपत्रांचे रकानेचे रकाने भरतात आणि जनतेचे मनोरंजन करतात. पण उघड-उघड कँन्सरने माणसे मरत असताना गुटखा बंदी सरकारने केलेली असताना प्रतिदिन ३ कोटींपेक्षा जादा व महीना १०० कोटींचा गुटखा हप्तेखोर अधिकाऱ्यांना हप्ते देऊन विकला जात असताना मनसे सारखा एखादा राजकीय पक्ष आंदोलन पुकारतो. परंतू सत्तेत असलेले राष्टवादी वगळून इतर पक्ष अशा जीवघेण्या गुटखा विरोधात का बोलत नाहीत? यांनाही काही पत्रकारांसारखा हप्ता पोहचविला जातो का? असा प्रश्न जनतेमधून केला जात आहे.

आणखी कीती लोकांचे कँन्सरने जीव घेतले जाणार आहेत? गुटखा खाऊन पिचकारी मारणारे तरुण थुंकीतून कोरोना पसरवित नाहीत का? आजचा छोटा-मोठा व्यवसाय करणारा तरुण तोंडात एक-एक तासाने गुटखा घालून आपल काम करताना दिसत आहे. गुटखा खाऊन सार्वजनिक ठीकाणी करोना काळात अस्वस्थता करुन भिंती रंगविल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाचे शासकीय खाजगी कामगार वहान चालक खाजगी वहातूकदार सर्रास गुटखा सेवन करुन करोना सारखा साथरोग फैलावण्यास कारणीभूत ठरत असताना जिल्हात गुटखाबंदी करण्यास जिल्हा प्रशासन का धाडस करुन आपले शौर्य या गुटखा विक्रेत्यांविरुद्ध दाखवित नाही.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!