हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सन राईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला ; हिंदुजनजागृती समितीची मागणी
_*🛑 हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सन राईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला ; हिंदुजनजागृती समितीची मागणी*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि-१५:-* हिंदु आणि हिंदुत्व वेगळे भासवून हिंदूंचे श्रद्धाभंजन आणि बुद्धीभेद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणार्या सलमान खुर्शिद यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. सलमान खुर्शिद आणि त्यांच्या पुस्तकाच्या आधारे काँग्रेसचे नेते हिंदु समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जगभरात पसरलेल्या हिंदू समाजाच्या संदर्भात अपप्रचार करून त्यांना संकटात टाकत आहेत. प्रत्यक्षात कोणताही पुरावा नसतांना हिंदुबहुल देशातच हिंदुत्वाला आतंकवादी ठरवून आणि त्याविषयी अपसमज पसरवून हिंदूंची मानहानी करत आहेत. हे अतिशय अनुचित आहे. आपल्या देशात विचार आणि लेखन स्वातंत्र्य असले तरीही त्याचा लाभ घेऊन एका संपूर्ण १०० कोटी जनसंख्येच्या विशाल समाजाला आतंकवादी ठरवून अपमानीत करणे कायद्यानेही गुन्हा आहे. हे रोखण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावेत, हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सन राईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घालण्याविषयी हिंदुजनजागृती समितीच्या वतीने मा. केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यासाठी येथील सावंतवाडी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी अधिवक्ता वैभव चव्हाण हिंदुजनजागृती समितीचे चंद्रकांत बिले, जीवन केसरकर, उमाजी चव्हाण आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले कि, हिंदु धर्म सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वाेच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धती असे म्हटले आहे. असे असतांना केवळ हिंदु समाजाची बदनामी करण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या संदर्भात गैरसमज पसरवून ‘हिंदुफोबिया’ निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे. ‘गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळे ऋषिमुनी आणि संत यांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे. हे आक्रमक हिंदुत्व ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ यांसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखेच आहे’, असा उल्लेख पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक ११३ वर करण्यात आला आहे. अशा प्रकारे लिखाण करून सलमान खुर्शिद यांनी हिंदूंना अपमानित केले आहे. जे वास्तव नाही, त्याचा आभास निर्माण करून हिंदूंना झोडपण्याचे काम काँग्रेस करत आली आहे.
*सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकाच्या संदर्भात आम्ही पुढील सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत* -१)राजकीय उद्देशांनी एकीकडे हिंदूंची मते मिळवण्यासाठी मंदिरांत जाण्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे मुस्लिम वोटबँकेसाठी हिंदुत्वावर आरोप करायचे, हे काँग्रेसी षड्यंत्र आहे. त्याचसाठी आम्ही हिंदुत्वावर आरोप करत आहोत, हिंदु धर्मावर नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात हिंदु धर्म आणि हिंदुत्व वेगळे नाहीत.२). याविषयी खुलासा करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हिंदुत्व म्हणजे मारणे, हत्या करणे असे सांगून अजूनच यात तेल ओतले आहे. यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
३) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण मुनी नाही, तर राक्षस आहेत, असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
४)हिंदूंविषयी काँग्रेसला खरोखरच कळवळा असता, तर त्यांनी बांगलादेश-पाकिस्तान-अफगाणिस्तान येथील हिंदूंवर जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांकडून होणार्या अत्याचाराच्या संदर्भात आवाज उठवला असता. त्यांनी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असते, त्यांनी हिंदु धर्माचे, हिंदूंचे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली असती; पण तसे होतांना दिसत नाही.
५) हिंदु आणि हिंदुत्व यांविषयी शब्दच्छल करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्या काँग्रेसने आजवर कधीतरी ‘इस्लाम आणि जिहादी आतंकवाद’ यांविषयी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. त्या वेळी मात्र आतंकवादाला धर्म नसतो, असे सांगितले जाते.
*याविषयी आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत* –
1. हिंदुद्वेषी लिखाण करणार्या सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी. ‘सॅटनिक व्हर्सेस’ या अन्य धर्मियांच्या संदर्भातील पुस्तकावर भारतात बंदी घातली जाऊ शकते, तर ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावरही बंदी घालण्यात यावी.
2. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या सलमान खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_
_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_
*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*
🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*
💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*
🔥 *Authorised Multibrand outlet*🔥
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁
📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣
————————————————–
*💁🏻♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*
(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*
👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈
_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_
_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_
_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_
_💁🏻♂️एकदा अवश्य भेट द्या…!_
🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*
_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_
*📱 संपर्क*
विनायक 9405099961
अनिकेत 7410594392
विशाल 9766096488
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

