दुहेरी हत्याकांडाचा यशस्वी तपास करणाऱ्या सावंतवाडी पोलिसांचे मनापासून कौतुक
🟣पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक निरीक्षक सय्यद, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांचे विशेष कौतुक
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ संपादकीय :-सीताराम गावडे*
🎴सावंतवाडी,दि,:-१५ नोव्हेंबर
सुंदर वाडी अर्थातच आताची सावंतवाडी, ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर, सद्गुरु साटम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक नररत्न जन्मली, बापूसाहेब महाराजांनी शिक्षणाचे दालन या भूमीतचं सुरू केले त्यामुळे सावंतवाडी शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून गणले जाऊ लागले, या शहराची प्रतिमा अलीकडे अवैद्य धंद्यातून होणाऱ्या घटनांमुळे मलीन होऊ लागली आहे,त्यातच सावंतवाडी शहरात घडलेलं दुहेरी हत्याकांड या दुहेरी हत्याकांडाचा कसलाही पुरावा मागे नसताना किंवा खुनाचा मोठा हेतू डोळ्यासमोर दिसत नसताना, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे, त्यांचे सहाय्यक निरीक्षक सय्यद व संपूर्ण टीम तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाने जो काही दिवसातच खुनाचा उलगडा होऊन आरोपीला जेरबंद केले त्यामुळे सावंतवाडी पोलिसांवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
आम्ही सुरुवातीला सांगितले होते, पोलीस हे काही परमेश्वर नाहीत, त्यांनाही माणसासारखे दोन डोळे ,कान ,नाक ,हात ,पाय ,आहेत फक्त कायद्याने अधिकार मिळालेत एवढेच, नागरिकांनी सहकार्य केल्यास एखाद्या घटनेचा तपास करायला पोलिसांना सोपे होते त्यामुळे मदतीचा हात जोपर्यंत पोलिसांना मिळत नाही तोपर्यंत खऱ्या खून्या पर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही, पोलिसांनी संशय म्हणून कोणाला तरी उचलले थर्ड डिग्री चा वापर केला तर आम्हीच त्यांच्याविरुद्ध लिहू पोलिसांचे अमानवी कृत्य.
असे अतानासुद्धा पोलिसांनी अतिशय शांत डोक्याने,कुठेही गाजावाजा न करता,आक्राळस्तानेपणा न करता आरोपीच्या मुळापर्यंत जाऊन त्याला बेड्या ठोकल्या एवढेच नाही तर चोरीला गेलेला माल हस्तगत करून खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले ,त्यामुळे सावंतवाडी पोलिसांना व संपूर्ण टीम ला मनःपूर्वक धन्यवाद अभिनंदन.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी घेतली, आम्ही त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यातील माणूस जागा असलेला मी पाहिला, त्यामुळे शंकर कोरे निश्चितच चांगले काम करतील असा मला विश्वास होता व तो मी माझ्या सहकारी मित्रांना पण बोलून दाखवला.
सावंतवाडीत ही दुहेरी खूनाची घटना घडल्यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठत होती,आम्ही मात्र शांत होतो, कारण आम्हाला विश्वास होता पोलीस निरीक्षक शंकर कोरे व त्यांचे सहकारी खून्या पर्यंत १०० टक्के पोहोचतील व ते पोहोचले व खऱ्या खून्याला गजाआड केले.
एखाद्या व्यक्तीला पदभार स्वीकारल्यानंतर काही काळ देणे गरजेचे असते ,त्वरित त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असते व नेमके तेच आम्ही केले या खुना मागील सत्यता पडताळणी चे काम पोलिसांचे होते त्यांना तपासात बाधा होईल असे कोणतेही कृत्य समाजातील कोणत्याही घटकाने करू नये अशी पोलिसांची रास्त अपेक्षा असते, त्यामुळे या खुना बाबत आम्ही एक-दोन बातम्या वगळता काहीच लिहिले नाही, मला काही जणांनी विचारले तुम्ही या खुनाबद्दल सडेतोड का लिहित नाही, मी म्हणालो थांबा आणि पहा पोलिसांनाही आपल्या पद्धतीने तपास करू दे पोलिसांचा तपास संपला की मी काही ते लिहिण, मला विश्वास होता सावंतवाडी पोलीस खऱ्या खुन्या पर्यंत पोहचतील.
गृहराज्यमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी स्थानिक पोलिसांना मुख्य आरोपी मिळत नसेल हा तपास सीआयडीकडे देण्याची आपण मागणी करणार असल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी केसरकर यांच्या पत्रकार परिषदेच्या अवघ्या काही तासातच खून्याला गजाआड केले खरतर स्थानिक पोलिसांना वगळून अन्य यंत्रणेकडे तपास देण्याची मागणी करणे म्हणजे पोलिसांचे खच्चीकरण करण्यासारखे आहे असे आमचे ठाम मत आहे, स्थानिक पोलीस जर अपयशी ठरले तर इतर यंत्रणेकडे तपास देणे उचित ठरते,, मात्र तसे न करता दोन चार दिवस उलटले की सीआयडीकडे तपास द्या अशी मागणी करणे मुळात हास्यास्पद आहे
या खूनातील जो आरोपी आहे त्याने सुरुवातीपासून पोलिसांना गुमराह करण्याचे काम केले, त्यामुळे पोलिसही चक्रावले ,पोलीस मला नाहक त्रास देतात ,म्हणून मी आत्महत्या करीत आहे ,यापुढे तुला मी दिसणार नाही असे बायकोला फोन करून सांगितले, पोलिसांनी त्यांची समजून काढून सावंतवाडीत कुटीर रुग्णालयात दाखल करून उपचार करणे नंतर तो संशयित आरोपी अचानक बेपत्ता होणे या सर्व घटना चक्रावून सोडणाऱ्या तर होत्याच शिवाय विश्वास बसणाऱ्या नव्हत्या, एखादा सुवर्णकला घडवणारा कारागीर कंगाल झाला म्हणून अशा प्रकारचे कृत्य करू शकले का? हा मला पडलेला प्रश्न होता, त्यामुळे या खुनामागे स्थानिक नसावा मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असावा असा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे एकाच बाजूने वळवली होती, हे शेवटपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नाही, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुशल उर्फ विनायक नागेश टंगसाळी याच्या पोलिसांनी ठाणे येथून मुसक्या आवळल्या व थेट सावंतवाडी आणले, त्यावेळी त्याने आपण केलेल्या खूनाची कबूली देऊन चोरलेल्या वस्तू व वापरलेले शस्त्र पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास टाकला.
कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे ,पोलीस निरीक्षक शंकर कोरे ,सहाय्यक निरीक्षक सय्यद व संपूर्ण सावंतवाडी पोलीस टीम यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*