कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजी नगरसेवक विलास जाधव यांनी गरड प्रभागातून निवडणूक लढविण्याची नागरिकांची मागणी

*🛑 माजी नगरसेवक विलास जाधव यांनी गरड प्रभागातून निवडणूक लढविण्याची नागरिकांची मागणी*

*🛑त्या प्रभागातील जनतेशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही, हाच विलास जाधव यांच्या जमेचा भाग*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-१२ नोव्हेंबर*
सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर सत्ताधारी व विरोधक यांनी आपापले उमेदवार चाचपणी सुरू केली आहे, मात्र गेले चार ते पाच महिने गरड प्रभागाचे माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आपला प्रभाग पिंजून काढून नागरिकांशी असलेली नाळ तुटू दिली नाही, त्यामुळे अनेक नागरिकांनी विलास तूच आम्हाला नगरसेवक पाहिजे अशी गळ घातल्याची माहिती त्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिली आहे.
नगरपालिकेच्या सभागृहात दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले व सामाजिक कार्याचा पिंड असलेल्या विलास जाधव यांनी आपल्या प्रभागातील रस्ते, गटार, विज ,आदी नागरिकांच्या समस्या घरोघरी जाऊन सोडवल्या, गेल्या दहा ते पंधरा वर्षात विलास जाधव व गरड वासियांचे एक वेगळे नाते निर्माण झाले होते, व या आपुलकीच्या नात्यावर विलास जाधव यांनी त्या प्रभागातून दोन वेळा बाजी मारत यश संपादन केले होते, मात्र २०१५च्या निवडणुकीत तेथील प्रभागात आरक्षण पडल्यामुळे विलास जाधव यांना आरेकर यांच्या प्रभागामधून, उमेदवारी देण्यात आली होती, त्या प्रभागात सुद्धा विलास जाधव यांनी काटे की टक्कर दिली, मात्र त्यांना हार पत्करावी लागली.
परजयाने खचून न जाता जनतेशी असलेली नाळ जाधव यांनी तुटू दिली नाही, गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे, युवकांना विविध कामांसाठी प्रोत्साहित करणे, रखडलेली कामे करणे ,अशी कामे त्गेली पाच वर्षे त्यांनी सुरू ठेवली होती, त्यामुळे तेथील नागरिकांनी पुन्हा एकदा विलास जाधवच नगरसेवक पाहिजे असा हट्ट धरल्याने विलास जाधव यांनी निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचे ठरविले आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून विलास जाधव यांनी आपल्या प्रभागातून भाजपला मदत केली होती ,त्यामुळे मोठे मताधिक्य त्या प्रभागातून भाजपला मिळाले होते, हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे,त्यामुळे त्या मतदारसंघावर आजही विलास जाधव यांची पकड आहे हे त्यावेळी दिसून आले होते, त्यामुळे विलास जाधव यांनी पुन्हा एकदा आपले नशीब आजमावण्याचा ठरविल्याचेइ वृत्त आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!