🛑 लग्नाचे आमिष दाखवून एका १९ वर्षीय युवतीवर गोवा येथे कामाच्या ठिकाणी अत्याचार करत मातृत्व लादल्याचा खळबळजनक प्रकार..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१९ :-* प्रेमसंबंध ठेवत व त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तालुक्यातील एका १९ वर्षीय युवतीवर गोवा येथे कामाच्या ठिकाणी अत्याचार करत मातृत्व लादल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार एका परप्रांतीय युवकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील संबंधित युवती ही गोवा येथे एका खासगी कंपनीत कामाला होती. त्याच ठिकाणी कामावर असलेल्या एका परराज्यातील एका युवकाशी तिची ओळख झाली. ओळखीचे पर्यावसन पुढे प्रेमात झाल्यानंतर संबंधित युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व यातुन तिला मातृत्व प्रदान केले.
हा प्रकार निदर्शनास आल्यावर सदर युवतीने आपल्याशी लग्न कर असे सांगितल्यावर मात्र त्या युवकाने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या सदर युवतीने याबाबत घरच्यांना कल्पना दिली. त्यानंतर तिने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्या युवका विरोवात तक्रार दिली.
हा गुन्हा गोवा येथे ती कामाला असलेल्या ठिकाणी घडल्याने तो सावंतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करून शुन्य नंबरने संबंधित गोवा येथील पोलिस ठाण्यात पाठवण्यात आल्याचे सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

