मळेवाड -कोंडूरे गावात सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरण कडून कायदेविषयक जनजागृती..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴 मळेवाड, दि-१६ :- लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात गावोगाव जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मळेवाड कोंडुरे गावात विधी सेवा प्राधिकरण चे नेमलेले अधिकारी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांचे उपसरपंच हेमंत मराठे व ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर यांनी पुष्पुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी डी आर गावडे यांनी उपस्थित ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य यांना कायदेविषयक माहिती दिली.यानंतर मळेवाड जकातनाका कायदेविषयक जनजागृति करीता ग्रामस्थांची जनजागृति फेरी काढण्यात आली.यावेळी फेरी नंतर उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित ग्रामस्थांना विधि सेवा प्राधिकरणची कार्ये, प्राधिकरण करून कोणत्या व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविली जाते,विधी सहाय्य प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा या सर्व सेवांची माहिती डी आर गावडे व विधी स्वयंसेवक जितेंद्र जाधव यांनी उपस्थित ग्रामस्थांना, अंगणवाडी सेविका व व्यापाऱ्यांना माहिती दिली.यावेळी दुकानदार, रिक्षा व्यावसायिक,महिला यांना दशरथ गावडे, जितेंद्र जाधव, व शिपाई रमेश परवार यांनी कायदेविषयक माहिती पत्रक देण्यात आले.सदरचा उपक्रम हा सावंतवाडी दिवाणी न्यायाधीश आर आर बेडगकर व सह दिवाणी न्यायाधीश डी बी सुतार यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आला.

________________________

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!