🛑 अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य..
_*🛑 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली घोषणा..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*
*🎴मुंबई, दि-१३ :-* राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे.ही मदत खालील प्रमाणे राहील…
• जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
• बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
• बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
०

