कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

काँग्रेसचे शेतकरी-प्रेम म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को -अविनाश पराडकर………………काँग्रेसने लखमपूर खिरी प्रकरणी राजकीय खोटारडेपणा थांबवावा

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, ८ऑक्टोबर :-

लखिमपूर प्रकरणावरून भाजपचे सिंधुदुर्ग सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांनी कॉग्रेस च्या भूमिकेवर सडकून टिका केली असून प्रेतांवर राजकारण करण्याची काँग्रेसची सवय जाता जाणार नाही. लखमपुर खिरी प्रकरणातील सत्य निश्चितच उघडकीला येईल, पण तोवर थांबण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. त्याआधीच त्यांना आपले घाणेरडे राजकारण साधून घ्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या नावाने ढोल पिटत राजकीय स्वार्थ साधण्याची काँग्रेसची वृत्ती अतिशय घृणास्पद आहे.

लखमपुर प्रकरणी कोणतेही नेमके सत्य समोर येण्यापूर्वीच काँग्रेस योगी व मोदी सरकारवर शेतकरी नरसंहारासारखे आरोप करत आहेत. त्या घटनेपूर्वी सदर वाहनाची समोरची व मागची काच फुटलेली व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. घटनेची न्यायिक चौकशी होत आहे. पण त्याआधीच योगींसह मोदीना आरोपीच्या कठड्यात बसवायची लगीनघाई काँग्रेसला झाली आहे.

लखमपुरच्या घटनेत शेतकऱ्यांचे बळी जाणे दुर्दैवी आहेच. पण त्यामागची पार्श्वभूमीही तशीच चिंताजनक आहे. शेतकरी आंदोलनांचा वापर राजकारणासाठी आणि देशविघातक कृत्यांसाठी चालवला जाणे देशासाठी घातक आहे.

तसेही, आज शेतकऱ्यांच्या मृत्युसाठी जी काँग्रेस गळा काढत आहे, त्या शेतकऱ्यांबद्दलचे त्यांचे प्रेम ९ ऑगस्ट २०११ च्या मावळच्या गोळीबाराच्या वेळी कुठे गेले होते? त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचेच मुख्यमंत्री सत्तेवर होते ना? जनरल डायरलाही लाजवेल अशा अमानुष पद्धतीने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर त्यावेळी पोलिसांनी गोळ्या चालवल्या होत्या. या गोळीबारात मोरेश्वर साठे, शामराव तुपे या शेतकऱ्यांसह कांताबाई ठाकर या शेतकरी महिलेचाही बळी गेला होता हे ते आता सोयीस्करपणे विसरू पहात आहेत. जखमी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत १८५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना वर्षानुवर्षे न्यायालयात खेटा मारायला लावल्या होत्या. त्याच या काँग्रेसी पुतना मावशीला आता उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांसाठी कळवळ्याचा पान्हा फुटावा, हे अजब आहे.

लखमपुर खिरी प्रकरण चालू असतानाच तिकडे श्रीनगरमध्ये दोन तासात तीन हत्या झाल्या. दरम्यानच्या कारवाईत तिथे लष्कर ए तोयबाचे सहा दहशतवादी पकडले गेले. काश्मीरमधील आणखी एका पंडित कुटुंबाला संपवण्याच्या मोहिमेवर असतानाच ते पकडले गेले. त्यांनी आणखीही कबुली दिली आहे की काश्मिरी हिंदू व्यापाऱ्यांना मारण्याचे मिशनच त्यांच्याकडून राबवले जात आहे.

लखमपुर प्रकरणात तिथे पोलिसांशी उर्मटपणे हुज्जत घालणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या
प्रियांकाबाई आणि राहुलबाबाना हत्या झालेल्या हिंदू व्यापाऱ्यांच्या कुटुंबाला जाऊन भेटावेसे वाटले नाही. यापूर्वीही अतिरेक्यांमुळे काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना कधी प्रियांका आणि राहुल भेटल्याचे, त्यांना समर्थन दिल्याचे कोणाला आठवत असेल तर सांगावे.

का? त्यांना ताडणारे मुस्लिम दहशतवादी “बलशाली लोकां” मध्ये मोडत नाहीत का? ते निरागस आणि अजाण आहेत का? जो दुबळा आहे त्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे काम राहुल आणि प्रियांका करत असल्याचा दावा कॉंग्रेसी करत आहेत. असं उभं राहूनच राजकारण करायचं तर शेकडो उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रात जिथे तुमची सत्ता आहे, तिथे सहयोगी मंत्र्यांच्या वासनेच्या शिकारी झालेल्या आणि आत्महत्या करायची वेळ आलेल्या महिलांच्या खांद्याला खांदा लावून लढायला या एकदा, मग मानू! बाकी हिंदू आणि काश्मिरी अत्याचारित त्यांना कधीच दिसणार नाहीत, कारण तिथे गेले तर त्यांच्या आजोबा पणजोबांचे आत्मे तळमळतील.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कलंकित करण्यासाठी कितीही खालच्या पातळीवरचे राजकारण केले, तरीही त्यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही. सोनिया गांधीही यापुर्वी गुजरात दंगलीचा ठपका मोदींवर ठेवत त्यांचा उल्लेख “मौत के सौदागर” असा वारंवार करत राहिल्या. न्यायालयाने तोंडात चपराक दिली असली तरीही काँग्रेसची जित्याची खोड जात नाहीय. आज अशा बदनामीच्या खोट्या षडयंत्राना उघडे पाडतच मोदी पंतप्रधान झाले आहेत आणि राहुल गांधी वडिलोपार्जित मतदारसंघात पराभूत झाले आहेत हे तरी काँग्रेसने विसरू नये.

शेतकऱ्यांच्या नावावर मोदींना बदनाम करणे हे काही आजचेच “गांधी” राजकारण नाहीय! हे वर्षानुवर्षे देशहिताविरोधात सतत आतल्याआत खाजणारे आणि मोदी-योगींचा द्वेष करत जळजळणारे “गाझी” राजकारण, किंबहुना गजकरण आहे! अर्थात, यावर योग्य इलाज जनता करत आली आहे, तरीसुध्दा कुठेतरी कोणाच्यातरी स्वार्थाच्या वेलीवर चढत हे बांडगूळ हे ते राज्य पोखरत असतेच. देशविघातक कंड शमवून घ्यायला तेवढी तर तेवढी ताकद मिळते! अर्थात आपले हित न कळणाऱ्या झाडाला आपले वाळून जाणेच भोगावे लागते, हा भाग अलाहिदा. मरणाऱ्या म्हातारीपेक्षा सोकावणाऱ्या काळाची भीती अधिक असते, याची जाणीव समाजमनाला असणे हेच आज गरजेचे आहे.

 

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!