कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 चौकूळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकूळ येथे ‘वन्यजीव साप्ताह’साजरा..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴आंबोली, दि-०५ :-* विध्यार्थ्यांमध्ये वन्य जीव आणि वनस्पतीमध्ये रुची निर्माण होऊन वनसवर्धनाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असावा या उद्धेशाने, वनविभाग, आंबोली तर्फे एका मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन आज चौकूळ कनिष्ठ महाविद्यालय, चौकूळ येथे करण्यात आले होते. उपस्थित विद्यार्थी तसेच अध्यापक वर्गाला यात सहभागी करून घेताना वनपाल श्री. वसंत चाळके, निसर्ग अभ्यासक श्री. हेमंत ओगले तसेच वनरक्षक श्री. गोरख भिंगारदिवे व श्री. हेमंत पटेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वनपालांनी उपस्थितांना वन्यजीव आणि विविध वनस्पतीनचं मानवी जीवनातील महत्व पटवून दिलं तर निसर्ग अभ्यासक ओगले यांनी चौकूळ आंबोली परिसरात आढळून येणाऱ्या नवनवीन प्राणी तसेच वनस्पतीनच्या प्रजाती विषयी उपयुक्त माहिती दिली. महाविद्यालयाच्या आवारात उपस्थित्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!