कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 माजी जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 *✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*

*🎴वैभववाडी, दि-०५ :-* माजी जिल्हा परिषद सदस्य व तिरवडे तर्फे खारेपाटण गावचे रहिवासी धोंडीराम दत्ताराम पवार वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात ते धोंडूशेठ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाने तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धोंडीराम पवार यांची वैभववाडी तालुक्यात प्रसिद्ध व्यापारी अशी ओळख होती. भुईबावडा येथे ते अनेक वर्षे किराणा दुकान चालवत होते.

त्यांनी तिरवडे गावचे उपसरपंच व व्यापारी मंडळ वैभववाडी तालुक्याचे अध्यक्ष पद भुषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!