कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री विलास गावडे यांच्याकडून कै. अण्णा मडवळ यांच्या स्मरणार्थ शवपेटी खरेदीसाठी पंचवीस हजार रूपयांची भरघोस मदत..

_*🛑 अण्णाप्रेमींनी मानले श्री विलास गावडे यांचे आभर..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*

*🎴वेंगुर्ले, दि-०४ :-* म्हापण येथील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सर्पमित्र कै. अण्णा मडवळ यांच्या स्मरणार्थ अण्णाप्रेमींनी म्हापण पंचक्रोशीची गरज ओळखून शवपेटी घेण्याचा ठरविले आहे. यासाठी अण्णाप्रेमींकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वेंगुर्ल्याचे श्री विलास गावडे यांनी तब्बल पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः म्हापण मध्ये येवून ही मदत अण्णा प्रेमींकडे सुपुर्द केली. यावेळी उपस्थित अण्णाप्रेमींनी त्यांचे म्हापण मध्ये स्वागत करुण मनपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!