कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 प्रशांत यादव यांच्या हस्ते अन्वर जबले यांचा सत्कार..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-३० :-* काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले यांची कालुस्ते खुर्द मजरेकाशी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वेळी निवड झाली. त्यानिमित्त काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते श्री. जबले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे प्रवक्ते वासुदेव अप्पा मेस्त्री, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुलजार कुरवले, तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले, खेर्डीचे माजी सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश पाथरुड, ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद भुरण, संजय पाटील, सुरेश मांदाडकर, नगरसेवक परिमल भोसले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!