🛑 अखेर साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली सुसज्ज रुग्णवाहीका..
🛑 भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले रुग्णवाहिकेचे उद्घाटन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२९ :- महाराष्ट्र शासनातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेस १४ रुग्णवाहीका प्राप्त झाल्या आहेत.त्यातील साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त रुग्णवाहीकेचे उद्घाटन आज साटेली भेडशी देवस्थान समिती अध्यक्ष श्री.सदानंद धर्णे,श्री.पांडुरंग धर्णे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या रुग्णवाहीकेमुळे साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
येणार्या काळात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि चांगली असावी,यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात येणार असून पुन्हा करोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन डॉ.दळवी यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवी, दोडामार्ग पंचायत समिती उपसभापती सुनंदा धर्णे, पंचायत समिती माजी उपसभापती श्री.बाळा नाईक,दोडामार्ग उपनगराध्यक्ष श्री.चेतन चव्हाण, शिवसेना उप जिल्हा संघटक गोपाळ गवस ,भाजप तालुकाअध्यक्ष श्री.प्रविण गवस,श्री.शैलेश दळवी,रंगनाथ गवस, शिवसेना उपज़िल्हा संघटक महिला विनिता घाडी, विभाग प्रमुख कोणाळ संतोष मोर्ये,महिला आघाडी उप दिपाली दळवी, कानू दळवी, राजू धरणे, माजी सरपंच नामदेव धर्णे, हेमंत कर्पे, शाखा प्रमुख कोणाल, आपा पांगम साटेली भेडशी सरपंच लखु धर्णे,सरचिटणीस संजय सातार्डेकर,महेश धर्णे,सूर्यकांत धर्णे,उपाध्यक्ष योगेश महाले,घोटगे सरपंच श्री.संदिप नाईक,कोनाळ सरपंच श्री.पराशर सावंत,खानयाळे सरपंच श्री.विनायक शेटये,खोक्रल सरपंच श्री.देवेंद्र शेटकर,कल्पना बुडकुले, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो , सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस, सुनिल गवस,राजेश फुलारी,भैय्या पांगम,सोमा धर्णे,दशरथ पडते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

