🛑 रक्तदान शिबिर व रक्त मित्र हे वाढवण्याचे काम करणाऱ्या मंडळांचा सत्कार होणे किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संमेलन होणे गरजेचे..
_*🛑 सदस्य साईनाथ आंबेरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२९ :-* सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी च्या माध्यमातून सिंधुदुर्गात रक्तदान शिबिर व रक्त मित्र हे वाढवण्याचे काम सिंधुदुर्गातील स्थानिक मंडळ जीवावर उदार होऊन सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने काम करत आहेत. अशा मंडळांचा सत्कार होणे किंवा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संमेलन होणे गरजेचे आहे. त्यामुळे मंडळाला प्रेरणा मिळेल व रक्तदान संबंधित जनजागृती निर्माण होईल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी हे पद रिक्त असून त्वरित भरण्याबाबत विचार व्हावा तसेच एखाद्या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कोणताही त्रास होऊ नये याकरिता ही रिक्त पदे तात्काळ भरावी या सर्व विषयांची माहिती घेऊन योग्य ती तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कसाल येथील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य साईनाथ प्रभाकर आंबेरकर यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

