🛑 सावर्डे (मांडकीतील)प्रथमेश राजेशिर्केचे युपीएससीत यश..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴सावंतवाडी, दि-२६ :-* केंद्रीय लोकसेवा (युपीएससी)२०२०चा निकाल जाहीर झाला.या परिक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे (मांडली) येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के हा उत्तीर्ण झाला आहे.आमदार शेखर निकम यांच्यासह सर्वस्तरातुन प्रथमेशचे अभिनंदन होत आहे.आ.निकम यांनी प्रथमेशची भेट घेऊन खास कौतुक केले.पेढा भरवुन अभिनंदन केले.
प्रथमेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील वालावलकर हायस्कुल मध्ये झाले.यानंतर त्याने वालचंद काॅलेज सांगली येथुन इंजिनिअरिंगची पदवी घेतली.एक वर्ष नोकरी करुन त्याने पूणे व दिल्ली येथे राहुन तीन वर्षे युपीएससीचा अभ्यास केला.प्रथमेशचे वडील अरविंद बापुसाहेब राजेशिर्के भारतीय सैन्यात मेजर होते.गेल्या मे महिन्यात त्याचे निधन झाले.त्याचे आजोबा ब्रिटीशाच्या काळात शासकीय सेवेत होते.लहानपणापासुन युपीएससी परीक्षेत यश मीळवायचे असा प्रथमेशचा ध्यास होता.त्याला वडीलाचे सख्खा मावसभाऊ उमेश राजेशिर्के, बहिण यांचे मार्गदर्शन लाभले.

